कर्नाटकमध्ये एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. बसने प्रवास करताना बऱ्याचदा लोक खिडकीतून हात किंवा डोकं बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. पण असे करणे तुमच्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते. एका महिला प्रवाशाबरोबर असाच प्रकार घडला आहे. बसने प्रवास करत असताना महिलेने उलटी करण्यासाठी खिडकीतून डोके बाहेर काढलं असताना तिला टँकर लॉरीने धडक दिल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी कर्नाटक येथे घडला. ही महिला म्हैसूरहून गुंडलुपेट येथे जात होती.
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code
नेमकं काय झालं? : चामराजनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हैसूरहून गुंडलुपेटला जाणाऱ्या एका महिला प्रवाशाने उलटी करण्यासाठी खिडकीतून डोके बाहेर काढले. त्याचवेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका टँकर लॉरीची तिच्या डोक्याला धडक बसली. शरीरापासून शरिरापासून वेगळं झाल्याने महिला प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला. म्हैसूर शहरी विभागातील डिव्हीजन कंट्रोलर, डीएमई, डीटीओ आणि एसओ यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी तपासणीसाठी घटनास्थळाला भेट दिली.
हा हृदयद्रावक रस्ता अपघात म्हैसूर उटी महामार्गावर (25 जानेवारी) नंजनगुड तालुक्यातील मुद्धल्लीजवळ घडला. ही महिला केएसआरटीसी बसमध्ये म्हैसूरहून गुंडलुपेट मार्गे नंजनगुडला जात होती. शिवलिंगम्मा (58) असे मृत महिलेचे नाव आहे, ती चामराजनगर जिल्ह्यातील गुंडलुपेट तालुक्यातील हलहल्ली येथील रहिवासी आहे.
