Air India च्या विमानात 5 तास अडकून पडले प्रवासी....

Air India च्या विमानात 5 तास अडकून पडले प्रवासी....

खाली उतरवण्यासाठी घातला गोंधळ... व्हायरल होतोय Video

‘Horrible experience’ : Air India passengers create ruckus after delay in flight leaves them stuck on board

'Open the door!' : Passengers of delayed Air India flight seen banging overhead bin in viral video : Video : मुंबईहून दुबईला जाणाऱ्या एअर इंडियाच्या (A1909 - Mumbai-Dubai) विमानातील प्रवाशांना प्रचंड मनस्तापाचा सामना करावा लागल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांच्या विमानाच्या उड्डाणाला सुमारे 5 तास उशीर झाल्याने प्रवासी विमानातच अडकून पडल्याचे पाहायला मिळाले. यासंबंधीचा एक व्हिडीओ समोर आला असून यामध्ये विमानातील प्रवासी केबिन क्रूशी वाद घालताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे.

QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा

Download QR Code

logo
Pay Yearly ₹ 50
₹ 50 एक वर्ष
रिपोर्टनुसार, विमानाचे उड्डाण हे सकाळी 8 वाजून 25 मिनिटांनी होणार होते. पण उड्डाणासाठी तांत्रिक बिघाडामुळे त्याला चार तास 45 मिनिटे उशीर झाला. इतका उशीर झाल्याने विमानातील प्रवाशांनी विमानाच्या आत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांना दुपारी एकच्या सुमारास विमानातून खाली उतरवण्यात आले.
logo
Pay Monthly ₹ 10
₹ 10 एक महिना
या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये प्रवासी केबिन क्रू क्रमचाऱ्यांशी भांडताना दिसत आहेत. काहीजण आदळाआपट करताना देखील पाहायला मिळत आहेत. विमानातील प्रवासी त्यांना विमानाबाहेर जाऊ दिले जावे अशी मागणी करत होते. आम्हाला तुमच्यावर विश्वास नाही, दरवाजा उघडा असा संवाद व्हिडीओमध्ये ऐकायला मिळत आहे. विमानातील कॅप्टन विमानला जॅक जोडणे आवश्यक आहे, कृपया समजून घ्या, असं उत्तर प्रवाशांना देत असल्याचे ऐकू येत आहे.
logo
Pay Daily ₹ 1
₹ 1 एक दिवस
हा व्हिडीओ या विमानातून प्रवास करणाऱ्या तेजस्वी अनंदकुमार सोनी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. एअर इंडियाच्या AI909 विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अत्यंत भीषण अनुभव आला. विमान सकाळी 8 वाजून 25 मिनिटांनी उड्डाण करणे अपेक्षित असताना, विमानात एसी सुरू नसल्याच्या स्थितीत प्रवाशांना (लहान मुले आणि वृद्धांसह) पास तास उशिराचा सामना करावा लागला. प्रवाशांना गुदमरल्यासारखे वाटू लागले आणि तरीही प्रवाशांनी त्यांना गेट उघडण्यास आणि खाली उतरू देण्यास भाग पाडेपर्यंत विमानातील कर्मचाऱ्यांनी त्यांची कोणताही मदत केली नाही”.
सोनी यांनी असाही दावा केला की प्रवाशांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी कॅप्टन कॉकपिटच्या बाहेर आले नाहीत. ते म्हणाले की, “आम्हाला अत्यंत जबाबदार उद्योग समूह असलेल्या @tata_trusts च्या मालकीच्या एअर लाइनकडून ज्या प्रकारचा अनुभव अपेक्षित होता तसा अनुभव मिळाला नाही. कॅप्टन एकदाही प्रवाशांबरोबर परिस्थितीबद्दल चर्चा करण्यासाठी कॉकपिटमधून बाहेर आले नाहीत, 5 तास वाट पाहिल्यानंतर प्रवाशी जोपर्यंत गोंधळ घालत नाहीत तोपर्यत ते आतच शांतपणे वाट पाहात राहिले”.
logo payment
अर्धवट नाही.. वाचा पूर्ण बातमी...!
पूर्ण बातमी वाचण्यासाठी Payment करा
logo top
प्रीमियम मेंबरशिप घेतले असेल तर Login करा
logo
Pay Yearly ₹ 50
₹ 50 एक वर्ष
logo
Pay Monthly ₹ 10
₹ 10 एक महिना
logo
Pay Weekely ₹ 5
₹ 5 एक आठवडा
logo
Pay Daily ₹ 1
₹ 1 एक दिवस
प्रीमियम मेंबरशिप घेतले नसेल तर Payment करा आणि पूर्ण बातमी वाचा कोणत्याही अडथळ्याविना
Browser Setting

‘Horrible experience’ : Air India passengers create ruckus after 5 hour delay in Mumbai Dubai flight leaves them stuck on board

Open the door : Passengers of delayed Air India flight seen banging overhead bin in viral video

Air India च्या विमानात 5 तास अडकून पडले प्रवासी....
खाली उतरवण्यासाठी घातला गोंधळ... व्हायरल होतोय Video

Support belgavkar