रस्ते अपघातात शेकडो लोकांचे बळी जात असल्याची आकडेवारी दरवर्षी समोर येत असते. त्यावर सरकारकडून वेळोवेळी उपाययोजना, जनजागृती, यंत्रणेतील सुधारणा अशा गोष्टी केल्या जात असतात. पण बसस्टँडवर प्रवाशांसाठी उभ्या असलेल्या बसचा अपघात होऊन तीन जणांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. ही धक्कादायक घटना बसस्थानकावर लावण्यात आलेल्या CCTV मध्ये कैद झाली आहे. या घटनेमुळे सगळ्यांचाच थरकाप उडाला असून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही धक्का बसला आहे.
नेमकं झालं काय? : ही घटना घडली ती आंध्र प्रदेशच्या विजयवाडामध्ये. इथल्या पंडित नेहरू बस टर्मिनसच्या फलाट क्रमांक 12 वर आंध्र प्रदेश राज्य रस्ते परिवहन महामंडळाची एक बस उभी होती. सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ही बस प्रवाशांसाठी उभी असताना अचानक बसचालकाचं बसवरचं नियंत्रण सुटलं. त्यामुळे फलाटावरून ही बस थेट बसस्थानकात घुसली. बसस्थानकात त्यावेळी अनेक प्रवासी त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी बसची वाट पाहात होते. ही बस स्थानकात शिरून थेट वाट पाहात असलेल्या प्रवाशांच्या अंगावर गेली.
फलाटापासून तब्बल 20 ते 25 फूट आतपर्यंत बस स्थानकात शिरली. या घटनेमध्ये तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मृतांमध्ये एका 10 महिन्यांच्या चिमुकल्याचाही समावेश आहे.Video सोशल मीडियावर व्हायरलया संपूर्ण घटनेचं सीसीटीव्ही फूटेज आता सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलं आहे. काळजाचा थरकाप उडवणारी ही दृश्य पीटीआय वृत्तसंस्थेनं त्यांच्या अधिकृत एक्स (ट्विटर) हँडलवर शेअर केली आहेत. “बसचालकानं रिव्हर्स गिअर टाकण्याऐवजी बस पुढे नेली आणि थेट प्लॅटफॉर्मवर चढवली”, अशी माहिती राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक एम. येसू दानम यांनी दिली आहे. या घटनेवर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांनी शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या नातेवाईकांना त्यांनी 10 लाख रुपयांची मदतही जाहीर केली आहे.
Please click here to Watch this Video or photo on X (twitter)