केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थोडक्यात बचावले;

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थोडक्यात बचावले;

belgavkar.com | belgaum | belgavkar

राजस्थानमध्ये प्रचार सभेत जात असतानाच...

Rajasthan Assembly Election 2023 : प्रचारासाठी जात असताना मोठा अनर्थ टळला...

लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यातच सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपने तर 400 प्लसचा चंग बांधत प्रत्येक मतदारसंघात मोर्चेबांधणी करत मेगा प्लॅनिंग सुरू केले आहे. मात्र, या निवडणुकांआधी राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यांच्याकडे लोकसभेची रंगीत तालीम म्हणून पाहिले जात आहे. याचवेळी राजस्थानमध्ये निवडणुकांच्या प्रचारासाठी जात असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे थोडक्यात बचावले.
भाजप आणि काँग्रेसने राजस्थान, मध्य प्रदेशसह पाचही राज्यांच्या निवडणुका प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. या निवडणुकांच्या प्रचारासाठी दिग्गज नेत्यांची फौज मैदानात उतरवली आहे. भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यासह अनेक मंत्री, नेते सभा, रॅली, बैठका, मेळावे यांच्याद्वारे मतदारांपर्यंत पोहाेचविण्यासाठी कंबर कसली आहे. मात्र, राजस्थानमध्ये भाजपच्या प्रचारासाठी जात असताना मोठा अनर्थ टळला आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थोडक्यात बचावले.
नागौरच्या परबतसरमध्ये ही घटना घडली. गृहमंत्री अमित शाह हे मंगळवारी राजस्थानमधील नागौर जिल्ह्यातील बिडियाड गावातून छोटी सभा घेतल्यानंतर रथात बसले. सभास्थळी जात असताना, त्यांचा रथ विजेच्या तारांना धडकला. यानंतर ठिणगी उडाली आणि तार रस्त्यावर पडली. त्यानंतर रथ थांबवण्यात आला आणि शाह यांना दुसऱ्या वाहनातून रवाना करण्यात आले.
नेमकं काय घडलं...?
राजस्थान (Rajasthan Assembly Election) मध्ये भाजप आणि काँग्रेस यांच्यात काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. कर्नाटकमध्ये पराभव पत्करल्यानंतर आता भाजप सावध झाली असून, राजस्थानमध्ये सत्तापालटासाठी आक्रमक झाली आहे. ही निवडणूक गांभीर्याने घेतानाच विजयासाठी तयारी सुरू केली आहे. या प्रचाराच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सभेच्या ठिकाणी सुखरूप पोहोचले होते. मंगळवारी संध्याकाळी सुमारे 4 : 20 च्या सुमारास, परबतसर (नागौर) च्या बिडियाड गावातून छोटी सभा घेतल्यानंतर शाह रथात बसले. त्यांना परबतसरच्या गणेश मंदिरात असलेल्या सभेच्या ठिकाणी जायचे होते. तेथून सुमारे एक किलोमीटर पुढे आल्यानंतर डंकोली लोकलमध्ये रथाचा वरचा भाग विजेच्या तारेला धडकला. धडकेनंतर तारा लोंबकळत असल्याचे दिसून येत आहे. या अपघातात विजेच्या तारेतून ठिणग्या उडाल्या आणि रथ थांबवण्यात आला. या अपघातात शाह यांच्या ताफ्यातील नेते आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली. त्यांनी शाह यांना सुरक्षित गाडीत बसवले आणि सभेच्या ठिकाणी रवाना करण्यात आले. अपघातानंतर संपूर्ण परिसरातील वीजपुरवठा सुमारे तासभर खंडित झाला होता. विद्युत विभागाचे अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले नंतर शाहा सायंकाळी सभास्थळी पोहोचले. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह परबतसरमधील प्रचार सभेत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर टीकेची झोड उठवली. मान सिंह यांना परबतसरमधून विजयी करण्यासाठी मतदारांना साद घातली.

Amit Shah escapes narrowly as his vehicle touches power cable in Rajasthan

Narrow escape for Amit Shah as his chariot dashes against electric pole ahead of roadshow in Rajasthan

Narrow escape for Amit Shah chariot touches power cable

Rajasthan Assembly Election

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थोडक्यात बचावले;
राजस्थानमध्ये प्रचार सभेत जात असतानाच...

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm