बेळगाव—belgavkar—belgaum : मोटारसायकल चोरट्याला अटक करून त्याच्याकडून 1 लाख 45 हजार रुपये किमतीच्या 2 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. मंगळवारी खडेबाजार पोलिसांनी ही कारवाई केली असून रमेश चंद्रकांत अरळीकट्टी (वय 33) असे चोरट्याचे नाव असून न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली.
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code
वरील संशयिताला पोलिसांनी संशयास्पदरित्या ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने नाथ पै सर्कल येथून एका स्कूटरची चोरी केल्याची कबुली दिली. त्याचबरोबर खडेबाजार आणि शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी एक मोटारसायकल त्याने चोरली होती.
पोलिसांनी चोरीच्या दोन्ही मोटारसायकली जप्त केल्या असून त्यांची अंदाजे किंमत 1 लाख 45 हजार रुपये इतकी आहे. सदर कारवाई खडेबाजारचे पोलीस निरीक्षक श्रीशैल गाभी, पोलीस उपनिरीक्षक आर. बी. सौदागर, आनंद आदगोंड, ए. बी. शेट्टी यांच्यासह सहकाऱ्यांनी केली आहे.
