खुलेआम हातात शस्त्र आणि बंदुका नाचविनाऱ्यांना पोलिसांची अजिबात भीती वाटत नाही का??बेळगाव—belgavkar—belgaum : सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी हल्ली लोक काहीही करण्याची तयारी दाखवतात. काही लोक स्टंटबाजी करतात, तर काही लोक असं काही कृत्य करतात, जे पाहून एखाद्याला धडकी भरेल. या अशा लोकांवर पोलिस नेहमीच कारवाई करत असतात. पण असं असलं तरी देखील काही तरुण मंडळी छाती ठोकपणे अशी कृत्य करताना सरास आढळतात. पण त्यांच्या कृत्यामुळे ते स्वतः च अडकतात.
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code
अशाच काही स्टंट बाजी करणाऱ्या तरुणांचा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये ही तरुण मंडळी हातात बंदू घेऊन Reel बनवत आहेत. या संबंधीत व्हिडीओ समोर येताच, पोलिसांनी त्यांचा तपास सुरु केला आणि त्यांना चांगलाचं दम दिलायं. हा व्हिडीओ माळमारुती पोलिस ठाण्याच्या हद्दीमधील असल्याचं समोर आलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेले हे व्हिडीओ बघून कुणाचाही थरकाप उडेल. विचार करा ज्यांनी कोणी यांना असं कृत्य करताना समोरुन पाहिलं असेल त्यांची काय अवस्था झाली असेल.Click Here to Watch Videos or See More Photos
खुलेआम हातात शस्त्र आणि बंदुका नाचविनाऱ्या या पोरांना पोलिसांची अजिबात भीती वाटत नाही का? असा प्रश्न उपस्थित केले जात आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओ ची तपासणी करून माळमारुती पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केलीयं. सार्वजनिक ठिकाणी रीलचे व्हिडीओ तयार करून ते सोशल मीडियावर फिरवून भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या तरुणांना माळमारुती पोलिस ठाण्यात बोलावून पुन्हा असे प्रकार न करण्याचा इशारा देण्यात आला.
