बेळगाव—belgavkar—belgaum : रिसालदार गल्लीतील जुन्या महापालिका (तहसीलदार कार्यालय) कार्यालयातील गोदामाला अचानक आग लागण्याची घटना आज गुरुवारी दुपारी घडली.
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code
रिसालदार गल्ली येथील तहसीलदार कार्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या गोदामाला आज गुरुवारी दुपारी अचानक आग लागली. बंद असलेल्या गोदामातून धुराचे लोट बाहेर येऊ लागल्याने आगीचा सदर प्रकार उघडकीस आला.
आगिची माहिती मिळताच अग्निशामक दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचे काम हाती घेतले. पाण्याची फवारणी करून अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली असून आगीत कागदपत्रे जळाली आहेत.
