विद्यापीठात शिकवणाऱ्या एका महिला प्राध्यापिकेनं क्लासमध्येच विद्यार्थ्यासोबत लग्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. पश्चिम बंगालमधील एका सरकारी विद्यापीठात घडलेल्या या घटनेनंतर वाद निर्माण झालाय. प्राध्यापिकेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांनी घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिलीय.
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code
दरम्यान, प्राध्यापिकेनं हा सगळा एका प्रोजेक्टचा भाग होता. हे नाटक होतं आणि अभ्यासातला भाग होता असं सांगितलंय. अधिकाऱ्यांनी म्हटलं की, नादिया जिल्ह्यातील हरिंगहाटा इथल्या विद्यापीठात मनोविज्ञान विभागात हा प्रकार घडला. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये नवरीसारखं नटून थटून आलेली प्राध्यापिका आणि फर्स्ट इयरचा विद्यार्थी दिसतोय. यामध्ये विद्यार्थी प्राध्यापिकेच्या भांगेत कुंकू लावताना दिसत आहे. सिंदूर दान आणि जयमाला विधी करत असल्याचंही या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. विद्यापीठातला व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वाद निर्माण झाला (Psychology Department of the Haringhata Technology College in Nadia, about 150 km from Kolkata. The college functions under the Maulana Abul Kalam Azad University of Technology (MAKAUT)).
विद्यापीठाने या प्रकरणी 3 सदस्यांची समिती स्थापन केलीय. तसंच संबंधित प्राध्यापिकेकडे या प्रकरणी स्पष्टीकरण मागण्यात आलं आहे. प्राध्यापिकेने विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की, हा एक सायको ड्रामा होता. माझ्या विषयाच्या अभ्यासाचा एक भाग होता. यात काहीही खरं नव्हतं. प्राध्यापिकेनं दावा केला की व्हिडीओ फक्त विभागासाठी रेकॉर्ड केला होता. मानसशास्त्र विभागाची प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने व्हिडीओ लीक केला गेला आहे.
Click Here to Watch Videos or See More Photos
अधिकाऱ्यांनी सांगितले की, या प्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आली आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत प्राध्यापिकेला सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे. कुलगुरुंनी सांगितलं की, प्राध्यापिकेनं हा अभ्यासाचा भाग असल्याचं सांगितलंय. व्हिडीओ अंतर्गत अभ्यासासाठी करण्यात आला होता. तरीही या प्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आली असून लवकरच सर्व माहिती समोर येईल. प्राध्यापिकेनं सांगितलं की, फ्रेशर्स पार्टीशी संबंधित प्रोजेक्टचा हा एक भाग होता. तो चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आला आहे. व्हिडीओ जाणीवपूर्वक व्हायरल करण्यात आला आहे.
