प्रयागराजमध्ये महाकुंभ सुरू आहे. जगभरातून लाखो भाविक गंगा स्नानासाठी येत आहेत. भाविकांसाठी अनेक ठिकाणी प्रसादाची व्यवस्था करण्यात येत आहे. दरम्यान, प्रयागराजमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या ठिकाणी बनवण्यात आलेल्या प्रसादामध्ये एका पोलिसाने चिखल मिसळल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code
भाविकांसाठी बनवल्या जाणाऱ्या जेवणात चिखल टाकल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही ट्विटरवर हा व्हिडीओ पोस्ट केला. यामध्ये त्यांनी जनतेने दखल घेण्याबद्दल लिहिले आहे. या पोस्टमध्ये अखिलेश यादव यांनी लिहिले की, महाकुंभमध्ये अडकलेल्या लोकांसाठी जेवणाची व्यवस्था करणाऱ्यांचे चांगले प्रयत्न राजकीय वैमनस्यामुळे वाया जात आहेत हे दुर्दैवी आहे. जनतेने लक्षात घ्यावे!
हा व्हिडीओ प्रयागराजच्या सोराव भागातील आहे. व्हिडिओमध्ये, फाफमौ-सोराव सीमेवरील मलक चतुरी गावात रस्त्याच्या कडेला तीन मोठ्या भांड्यांमध्ये जेवण शिजवले जात असल्याचे दिसून येते. दरम्यान, एक पोलीस एका भांड्यात चिखल टाकत असल्याचे दिसत आहे.
मौनी अमावस्येला मोठ्या गर्दीमुळे बुधवारी महाकुंभात चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत 30 जणांचा मृत्यू झाला आणि 60 हून अधिक जण जखमी झाले. अपघातानंतर खबरदारीचा उपाय म्हणून प्रयागराजला येणारी वाहने रस्त्यांवर थांबवण्यात येत आहेत. लोक तासन् तास त्यांच्या वाहनांमध्ये बसून आहेत. काही लोक पायीही निघत आहेत. या लोकांसाठी काही स्वयंसेवी संस्थांनी वाटेत अन्न, पाणी इत्यादींची व्यवस्था केली आहे.
या व्हिडीओत पोलीस कर्मचारी रागात असल्याचे दिसत आहेत. हे प्रकरण सोराव पोलीस ठाण्याशी संबंधित असल्याने, तेथील इन्स्पेक्टर ब्रिजेश तिवारी यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करण्यात आला पण त्यांचा सीयूजी नंबर बंद दिसत होता. यामुळे, घटनेमागील कारण अद्याप कळू शकलेले नाही. चिखल टाकणाऱ्या पोलिसाची ओळख पटलेली नाही.
