बेळगाव—belgavkar—belgaum : बेहिशेबी मालमत्तेच्या आरोपांनंतर लोकायुक्त अधिकाऱ्यांनी बेळगावमध्ये सरकारी अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई सुरु केली आहे. बेकायदेशीर मालमत्ता जमवल्याच्या तक्रारीवरुन शुक्रवारी सकाळी लोकायुक्त अधिकाऱ्यांनी सरकारी अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांवर छापे टाकले.
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code
त्यामुळे सरकारी अधिकाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे. बेळगावचे (दक्षिण) उपनिबंधक सचिन मंदेड आणि रायबाग पशुवैद्यकीय अधिकारी संजय दुर्गनावर यांच्या घरांवर छापे टाकण्यात आल्याची माहिती लोकायुक्त अधिकाऱ्यांनी दिली आहे (Sachin Munded, Sub-Registrar in Belgaum (First Division Assistant at the Sub-Registrar office in Belgaum South), and Sanjay Durgannanavar, veterinary office).
बेहिशेबी मालमत्तेच्या आरोपांनंतर आज सकाळी रायचूर, बेळगाव आणि बागलकोट येथे लोकायुक्तांनी छापे टाकले. लोकायुक्त पोलिस अधीक्षक हनुमंतराय यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बेळगाव आणि खवतकोप्पा येथील या अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांवर छापे टाकले, अशी माहिती सूत्रांनी दिली. रायचूर जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाचे सहाय्यक लेखा अधिकारी नरसिंग राव गुज्जर यांच्या जवार कॉलनीतील घरावर छापा टाकण्यात आला. अधिकारी कागदपत्रांची तपासणी करत आहेत.
