कर्नाटक—belgavkar : रायचूर : सिंधनूरच्या शासकीय महाविद्यालयात एमएस्सी शिकणाऱ्या विद्यार्थिनीची गळा चिरून निर्घूण हत्या करण्यात आल्याची घटना रायचूर जिल्ह्यातील सिंधनुरात घडली. शिफा अब्दुल वाहिद (वय 22, रा. लिंगसनूर) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे (first-semester M.Sc (Mathematics) student of the Government Degree College at Sindhanur).
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code
आरोपी मुबीनने शिफा हिला गुरुवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास फोन केला. यावेळी विद्यार्थिनी महाविद्यालयामध्ये न जाता मुबीनशी बोलत होती. दोघांमध्ये वादावादी झाली आणि मुबीनने चाकू काढून शिफाचा गळा चिरून पळ काढला. प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने शिफाचा मृत्यू झाला.
Man kills college student over rejected marriage proposal in Karnatakaआरोपी मुबीन हा देखील त्याच शहरातील आहे. मुबीनचा लग्नाचा प्रस्ताव शिफाने नाकारल्याचे वृत्त आहे. यामुळे संतापलेल्या मुबीनने तिची हत्या केली. पोलिस उपाधिक्षक बी. एस. तलवार, ग्रामीण ठाणे मंडळ पोलिस निरीक्षक वीररेड्डी, बालागनूर निरीक्षक यारीप्पा यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. खून केल्यानंतर आरोपी मुबीनने लिंगसनूर पोलिस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले.
