Viral Video : बसचा प्रवास असो वा ट्रेनचा... हा प्रवास दिवसेंदिवस अत्यंत हालाकीचा होत चाललेला आहे. त्यात प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सर्व अशा समस्यांमधून प्रवास करताना प्रवास करणं धोकादायक ठरतं आहे. अनेकदा बसमधून आणि ट्रेनमधून प्रवास करताना अपघातही होतात. सध्या त्या संबंधित एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे,ज्यात बसमधून प्रवास करताना एका प्रवाशाचा पाय बसच्या स्वयंचलित दरवाज्यात अडकला गेला आहे.
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code
प्रवाशाचा पाय अडकला, पण बस थांबली नाही : व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक बसमधून अनेक प्रवासी (Passenger) दिसून येत आहे आणि चालक बस चालवताना दिसत आहे. सर्व परिस्थितीमध्ये बसमध्ये जर पाहिले तर एक व्यक्ती आहे जो बसच्या दरवाजातच उभा आहे. बसमध्ये जागा असताना तो व्यक्ती तिथे उभा आहे हे पाहून पहिल्यांचा आश्चर्य वाटे, मात्र जर नीट त्या व्यक्तीकडे पाहिले तर दिसेल की व्यक्तीचा पाय चक्क स्वयंचलित दरवाजामध्ये अडकला आहे. असे असूनही बस वेगाने धावत आहे. बसमध्ये असलेला कोणताही प्रवासी त्या व्यक्तीच्या मदतीला धावून आलेला नाही. सर्व धक्कादायक घटना बसमधीलच एका प्रवाशाने मोबाईलमध्ये कैद केलेली आहे.
संपूर्ण व्हिडिओ नक्की कुठला आहे हे समजू शकलेले नाही, मात्र तो व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील 'khushbu_journo' या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. व्हिडिओ काही महिन्यापूर्वीचा असल्याचे समजत आहे; मात्र सध्या मोठ्या प्रमाणात व्हिडिओ व्हायरल होत आहे. जवळपास लाखहून अधिक व्ह्यूज व्हिडिओला मिळाले आहेत.
व्हिडिओ (Video) पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रियाही केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंटमध्ये लिहिले आहे, ''चालकाविरोद्धात कारवाई झाली पाहिजे'' तर काही यूजर्संनी कमेंटमध्ये लिहिले आहे, ''बस चालकाला शिक्षा मिळालीच पाहिजे'' तर काही कमेंटमध्ये यूजर्संनी लिहिले आहे, ''व्हिडिओ बनवण्यापेक्षा त्याला मदत केली असती तर बर झाल असतं'', अशा अनेक संतापजनक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.
टीप : धक्कादायक हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
