प्रयागराजमध्ये आयोजित महाकुंभ मेळ्यात तैनात असलेले पोलीस उपनिरीक्षक (sub-inspector / PSI) अंजनी कुमार राय यांचा मृत्यू झाला. महाकुंभ मेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत 30 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये पोलीस अधिकारी अंजनी कुमार राय यांचाही समावेश असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. आता याबद्दल पोलीस प्रशासनाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code
पोलीस उपनिरीक्षक अंजनी कुमार राय यांना बहराईच जिल्ह्यात पोस्टिंग मिळालं होतं. पण महाकुंभानिमित्त अतिरिक्त पोलीस बंदोबस्त गरजेचा असल्यानं राय यांना तिकडे तैनात करण्यात आलं. बुधवारी कर्तव्यावर असताना राय यांची प्रकृती बिघडली. त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं (SI Anjani Kumar Rai Dies : Bahraich Cop on Maha Kumbh Duty Passes Away After Sudden Illness in Prayagraj). राय यांचा मृत्यू चेंगराचेंगरीची परिस्थिती हाताळत असताना झाल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात येत आहे. राय यांचा मृत्यू कुंभमेळ्यात तैनात असताना झाल्याची माहिती खरी आहे. पण चेंगराचेंगरीमुळे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती खोटी आहे.
बहराईचमध्ये पोस्टिंग मिळालेले राय यांना महाकुंभ मेळाव्यात तैनात करण्यात आलं होतं. बुधवारी ते कर्तव्यावर असताना त्यांची प्रकृती अचानक खालावली. त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना लगेचच रुग्णालयात दाखल केलं. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. अंजनी कुमार राय मूळचे गाझीपूरचे रहिवासी होते. सध्या त्यांना बहराईचमध्ये जबाबदारी मिळाली होती. त्यांचं संपूर्ण कुटुंब गोरखपूरमध्ये वास्तव्यास आहे. राय यांच्या अकाली निधनामुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या मित्र परिवारावर दु : खाचा डोंगर कोसळला आहे.
अंजनी कुमार राय यांच्या निधनाबद्दल समजताच त्यांचं कुटुंब महाकुंभाच्या दिशेनं रवाना झालं. राय यांच्या मृत्यूनंतर पोलीस दलावर शोककळा पसरली आहे. 'महाकुंभात तैनात असताना उपनिरीक्षक अंजनी कुमार राय यांची तब्येत अचानक बिघडली. त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. त्यांचं शवविच्छेदन करण्यात आलं. राय यांच्या कुटुंबाला पोलीस दलाकडून सर्वेतोपरी मदत देण्यात येईल,' अशी माहिती बहराईच जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक (ग्रामीण) दुर्गा प्रसाद तिवारी यांनी दिली.
