बेळगाव—belgavkar—belgaum : खानापूर : भारतीय सेवा मंचतर्फे रविवारी (दि. 2 फेब्रुवारी) सायंकाळी 5 वाजता जांबोटी रस्त्यावरील मलप्रभा क्रीडांगणावर हिंदू धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला हिंदू समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन हिंदुत्ववादी नेते पंडित ओगले यांनी केले.
ते म्हणाले, देशात हिंदूंवरील अत्याचारात वाढ झाली आहे. धर्मांतराचे प्रकारही वाढले आहेत. धर्मांतराला आळा घालून हिंदूंवरील अत्याचार रोखण्यासाठी धर्मसभेच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे. या सभेला बिळकी-मठाधीश चन्नबसव अवरोळी स्वामीजी, हिंदू राष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय देसाई उपस्थित राहणार आहेत.
हिंदू समाज बांधवांनी सभेला उपस्थित राहावे असे आवाहन ओगले यांनी केले. यावेळी विनायक चव्हाण, सोमनाथ गावडे, सुभाष गुरव, बबन लोंढेकर, मानसिंग चौगुले, जोतिबा चव्हाण, प्रणय गोरल, रजत सडेकर, शुभम आंबेवाडकर आदी उपस्थित होते.
