बेळगाव : 1 नोव्हेंबर काळादिनी फेरी

बेळगाव : 1 नोव्हेंबर काळादिनी फेरी

belgavkar.com | belgaum | belgavkar

12 जणांना नोटीस

बेळगाव—belgavkar : 1 नोव्हेंबर काळादिनी फेरी काढण्यात आल्यानंतर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांवर मार्केट पोलिसांत गुन्हा दाखल केला. त्यानंतर मार्केट पोलिसांकडून समितीच्या नेत्यांना पोलिस स्थानकात हजर राहा, अशा प्रकारची नोटीस बजावली आहे. आतापर्यंत 12 जणांना नोटीस बजावली आहे, तर उर्वरितांना नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती आहे.
1 नोव्हेंबर रोजी मराठी भाषिकांनी शांततेच्या मार्गाने फेरी काढली होती. तसेच प्रशासनाने केलेल्या सूचनांचे पालन केले होते. तरीही संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा दिल्या व कन्नड भाषिकांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न केला, असा आरोप करीत मार्केट पोलिस स्थानकात 2 नोव्हेंबरला समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, प्रकाश मरगाळे, सरिता पाटील, रणजित चव्हाण-पाटील, अंकुश केसरकर, नगरसेवक रवी साळुंके, नगरसेविका वैशाली भातकांडे, गजानन पाटील, शिवाजी सुंठकर, अँड. एम. जी. पाटील, आर. एम. चौगुले, नेताजी जाधव, सरस्वती पाटील व विकास कलघटगी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आतापर्यंत 12 जणांना नोटीस दिली असून तुमची चौकशी करण्यासाठी अनेक पुरावे आमच्याकडे आहेत. त्यामुळे नोटीस मिळाल्यानंतर पोलिस स्थानकात हजर राहावे, अशी सूचना नोटिसीद्वारे करण्यात आली आहे. मार्केट पोलिस स्थानकातील पोलिस निरीक्षक शशिकुमार कुरळे यांनी ही नोटिस बजावली आहे. याबाबत समिती नेत्यांशी संपर्क साधला असता नोटीस मिळाली आहे, त्याला कायदेशीर उत्तर दिले जाईल, अशी माहिती दिली.

belgaum case registered Market Police leaders of the Maharashtra MES November 1 black day March belgavkar बेळगाव belgaum

belgaum Maharashtra MES November 1 black day March belgaum

case registered Market Police MES belgaum

बेळगाव : 1 नोव्हेंबर काळादिनी फेरी
12 जणांना नोटीस

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm