इन्फोसिस फाऊंडेशनच्या माजी अध्यक्षा सुधा मूर्ती यांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. एका कार्यक्रमातील जावेद अख्तर आणि सुधा मूर्ती यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी सुधा मूर्ती यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. तसं तर बॉलिवूडचे प्रसिद्ध लेखक जावेद अख्तर यांची फॅन फॉलोइंग एखाद्या सुपरस्टारपेक्षा कमी नाही. त्यांच्या लेखणीची जादू जगभर प्रसिद्ध आहे. पण सुधा मूर्तींच्या त्या कृतीमुळे त्यांची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे.
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code
सुधा मूर्ती या बिझनेस टायकून असून इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी आहेत. सुधा मूर्ती या स्वतः 1600 कोटी रुपयांच्या कंपनीच्या अध्यक्षा आहेत आणि त्यांचे जावई इंग्लंडचे माजी पंतप्रधान होते. एवढा उच्च दर्जा असूनही सुधा मूर्ती यांची ही साधी वागणूक अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली आणि त्यांनी लोकांची मनं जिंकली.
राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये आयोजित जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमधील हा व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, या महोत्सवात जावेद अख्तर यांना मंचावर उपस्थितीत आहे. त्यानंतर सुधा मूर्तींना मंचावर निमंत्रण देण्यात आले. तेव्हा सुधा मूर्तींनी जावेद अख्तर यांच्या पायाला स्पर्श करुन आशीर्वाद घेतला. जावेद अख्तर यांनी त्यांनी थांबवलं, त्यांनी आशीर्वाद घेतला. खरंच वयाच्या या टप्प्यातही भारतीय संस्कृती आणि साधेपणाने त्यांनी सर्वांची मनं जिंकली आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून सुधा मूर्ती यांच्या साधेपणाचे खूप कौतुक होतंय.
सोशल मीडियावर चाहत्यांच्या प्रतिक्रियासोशल मीडिया यूजर्सनी या व्हिडीओवर कमेंटचा पाऊस पाडलाय. एका यूजरने लिहिलंय की, 'आम्हाला आमच्या भारतीय संस्कृतीचा अभिमान आहे.' एखाद्या व्यक्तीचा आदर त्यांच्या महानतेवर अवलंबून नसून त्याच्या आचार आणि विचारांवर अवलंबून असतो. तर, दुसऱ्या युजरने म्हटलंय की, 'सुधा मूर्ती जी खऱ्या सुसंस्कृत भारतीय आहेत आणि त्यांना एक आदर्श महिला म्हणून पाहिलं जातं.' जावेद अख्तर यांच्या नवीन पुस्तकाचे प्रकाशन जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये जावेद अख्तर यांनी त्यांचे नवीन पुस्तक 'ग्यान सिपियन : पर्ल्स ऑफ विजडम' लाँच केलं. यावेळी ते सुधा मूर्ती आणि अभिनेता अतुल तिवारी यांच्यासोबत पॅनलवर होते. या सत्रात जावेद अख्तर यांनी शिक्षण, भाषा आणि सांस्कृतिक वारशाचे महत्त्व यावर आपले विचार मांडले.
