बेळगाव : त्या सावरकर पुलावरून जाणे बंद करायचे का?

बेळगाव : त्या सावरकर पुलावरून जाणे बंद करायचे का?

belgavkar.com | belgaum | belgavkar

सावरकरांचे छायाचित्र बेळगावच्या विधानसौधमधून हटवण्याची मागणी

बेळगाव—belgavkar : बंगळुरातील यलहंका येथे एका पुलाला सावरकरांचे नाव देण्यात आले आहे. त्या पुलावरून जाणे बंद करायचे का? तसे करता येत नाही. राज्यात समस्या निर्माण करण्याचे काम करणार नाही. सावरकरांचे छायाचित्र हटवण्याचा प्रस्ताव आपल्यासमोर नसल्याचे विधानसभेचे सभापती यू. टी. कादर यांनी स्पष्ट केले.
खादर यांनी विधान परिषद अध्यक्ष बसवराज होरट्टी यांच्यासह संयुक्त पत्रकार परिषद घेतली. राज्यात सौहार्दता निर्माण करणे हे आपले काम आहे. ते काम प्रामाणिकपणे करत आहे. काय हटवावे याचा विचार कधी केला नाही. काहीतरी योगदान देण्यासाठी आपण इथे आलो आहोत. याआधीच्या काळात काय घडते याच्यावर बोलणार नाही. राज्यात सौहार्दता नांदावी याची काळजी घेणे हे आपले काम आहे. समस्या निर्माण करणे हे आपले काम नसल्याचे कादर म्हणाले.
दरम्यान, विधानसभा कामकाजावेळी ग्रामीण विकास आणि पंचायतराजमंत्री प्रियांक खर्गे यांनी सावरकरांचे छायाचित्र विधानसौधमधून हटवण्याची मागणी केली. सावरकर ब्रिटिशांकडून पेन्शन घेत होते. त्यांचे छायाचित्र विधानसौधमधून हटवावे असे ते म्हणाले. पण, विधानसभा सभापती यू. टी. खादर यांनी या मागणीबाबत नाराजी व्यक्त केली. मंत्री व आमदारांनी आपले काम करावे. मी माझे काम करतो, असे सांगून छायाचित्र हटवण्याचा कोणताच प्रस्ताव नसल्याची माहिती सभागृहाला दिली. अशी मागणी करण्यापेक्षा मंत्री व आमदारांनी योग्यरीत्या काम करण्याची ताकीद त्यांनी दिली. यानंतरही खर्गे यांनी छायाचित्र हटवण्याच्या मागणीवर ठाम असल्याचे सांगितले.

No proposal to remove photo of Savarkar from Suvarna Soudha in Belgaum

Speaker advocates unity over Savarkar portrait row Belgaum

Savarkar’s portrait will stay in Belgaum Assembly Hall

No proposal to remove Savarkar portrait from Assembly

बेळगाव : त्या सावरकर पुलावरून जाणे बंद करायचे का?
सावरकरांचे छायाचित्र बेळगावच्या विधानसौधमधून हटवण्याची मागणी

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm