18 वर्षांपासून डोक्यात अडकलेली गोळी, येमेनहून आलेल्या रुग्णाला डॉक्टरांकडून जीवदान @कर्नाटक

18 वर्षांपासून डोक्यात अडकलेली गोळी, येमेनहून आलेल्या रुग्णाला डॉक्टरांकडून जीवदान @कर्नाटक

belgavkar.com | belgaum | belgavkar

त्यांच्या काही मित्रांकडून रुग्णालयाची माहिती मिळाली

कर्नाटक : बंगळुरूतील डॉक्टरांनी अवघड शस्त्रक्रिया करून एका माणसाच्या डोक्यात अडकलेली गोळी काढली आहे. ही गोळी 18 वर्षांपासून त्या माणसाच्या डोक्यात अडकली होती. ही गोळी तीन सेंटीमीटर लांबीची होती. गेल्या आठवड्यात बंगळुरू येथील एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर शस्त्रक्रिया करून ही गोळी काढण्यात आली. गोळीने झालेल्या दुखापतीमुळे 29 वर्षीय सालेह (बदलेलं नाव) बहिरे झाले होते. गोळी त्यांच्या डाव्या कानाजवळ अडकली होती. या गोळीमुळे बहिरेपणासह त्यांना तीव्र डोकेदुखी होत होती. तसेच कानातून सतत पू वाहत होता. आता त्यांची या त्रासापासून सुटका झाली आहे.
सालेह हे त्यांचे सहा भाऊ आणि तीन बहिणींबरोबर येमेनमधल्या एका छोट्या गावात लहानाचे मोठे झाले आहेत. त्यांचे वडील शेतकरी आणि आई गृहिणी होती. घराजवळच त्यांची शेती होती. या शेतात ते कांदा, टोमॅटो, बटाटा, लसूण आणि गाजर पिकवत होते. लहान असताना ते नेहमी शेताला पाणी देणे, खतफवारणी करण्यासारखी कामं करायचे. सालेह एक दिवस काहीतरी साहित्य खरेदी करायला दुकानात गेले होते. दुकानातून घरी जात असताना वाटेत घडलेल्या एका घटनेने त्यांचं पूर्ण आयुष्य बदलून गेलं.
सालेह यांनी एका व्हिडीओ कॉलदरम्यान टीओआयला सांगितलं की, मी दुकानातून घरी येत असताना वाटेत दोन गटांमध्ये हाणामारी चालू होती. या हाणामारीदरम्यान, लोकांनी एकमेकांवर गोळ्या झाडल्या. यातली एक गोळी मला लागली. खूप रक्त आलं मग लोकांनी मला रुग्णालयात नेलं. तिथल्या डॉक्टरांनी केवळ जखम स्वच्छ केली, वरून मलमपट्टी केली. परंतु, त्यांनी गोळी काढली नाही. कारण गोळी कानात घुसून पुढे कवटीत अडकली होती. कानात एक जखम झाली होती जी बरी होत नव्हती. त्यामुळे कानातून पू वाहत होता. सतत डोकेदुखी होत होती.
सालेह यांना त्यांच्या काही मित्रांकडून कर्नाटकातील बंगळुरूतल्या एका रुग्णालयाची माहिती मिळाली. त्यानंतर ते खूप अपेक्षांसह बंगळुरूत दाखल झाले. रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितलं की, ही शस्त्रक्रिया खूप अवघड आहे. त्यानंतर ते अ‍ॅस्टर रुग्णालयाच्या ईएनटी विभागाचे आणि क्वालिफायर इम्प्लांट सर्जरीचे प्रमुख सल्लागार डॉ. रोहित उदय प्रसाद यांना भेटले. डॉक्टर म्हणाले, गोळी तिथून काढल्यावर खूप रक्तस्राव होईल. दरम्यान, सालेह आणि डॉक्टरांनी ही शस्त्रक्रिया करण्याचं धाडस केलं. या शस्त्रक्रियेनंतर सालेह यांचं दुखणं कमी झालं आहे. तसेच त्यांना डाव्या कानाने काही प्रमाणात ऐकू येतंय. त्याचबरोबर कानातून पू निघणं बंद झालं आहे. सालेह या शस्त्रक्रियेनंतर येमेनला परत गेले आहेत. कानातली गोळी त्यांनी घेतली होती, परंतु, विमानतळावर या गोळीमुळे अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे त्यांनी ती गोळी तिथेच टाकून दिली.

Bengaluru doctors remove bullet from Yemeni mans head after 18 years

Bengaluru doctors remove bullet stuck in mans head for 18 years

Bengaluru doctors extract bullet lodged in mans head

Doctors remove bullet stuck in Yemeni mans head for 18 years

18 वर्षांपासून डोक्यात अडकलेली गोळी, येमेनहून आलेल्या रुग्णाला डॉक्टरांकडून जीवदान @कर्नाटक
त्यांच्या काही मित्रांकडून रुग्णालयाची माहिती मिळाली

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm