बेळगाव : बेळगावकर गुलाबी थंडीने गारठले; धुक्याची चादर

बेळगाव : बेळगावकर गुलाबी थंडीने गारठले;
धुक्याची चादर

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव शहर व परिसरात काही दिवसांपासून थंडी वाढली

बेळगाव—belgavkar : बेळगाव शहर व परिसरात काही दिवसांपासून थंडी वाढली आहे. दिवसभर कडक उन्ह, रात्री थंडी व सकाळी धुके असे वातावरण निर्माण झाले आहे. थंडीमुळे पाराही खाली गेला आहे. बेळगाव शहराचा पारा गुरुवारी 15.4 अंशावर येऊन पोहचला आहे. या महिन्यामध्ये थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
दरवर्षी ऑक्टोबर ते जानेवारी या कालावधीत थंडीचा जोर असतो. यंदा काही दिवसांपासून थंडी पडण्यास सुरुवात झाली आहे, मात्र काही दिवसांपासून या थंडीत वाढ झाली आहे. मागील काही दिवसांपूर्वी वातावरणात अचानक बदल होऊन पावसाने हजेरी लावली होती. आता डिसेंबरच्या सुरुवातीपासून थंडीने जोर धरला आहे. ढगाळ वातावरणामुळेहवेतील गारवा वाढण्याबरोबरच रात्री आणि पहाटे थंडी जाणवू लागली आहे.
थंडीपासून बचाव करण्यासाठी अनेक जण गरम कपडे खरेदी करण्याकडे वळले आहेत. थंडीमुळे शहराच्या उपनगरांसह ग्रामीण भागात शेकोट्या पेटू लागल्या आहेत. हवामानात वारंवार होणारा बदल आणि पडू लागलेली थंडी यामुळे सर्दी, खोकला, ताप यासारख्या आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. ऑक्टोबरचे उष्ण तापमान ओसरल्यानंतर एकदम थंडीला सुरुवात झाल्यामुळे आजारांना निमंत्रण मिळत असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येते. थंडीचा कडाका सुरू झाल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर याचा परिणाम होताना पाहावयास मिळत आहे.

belgaum weather cold wave cold wave belgavkar बेळगाव belgaum

belgaum weather cold wave cold belgaum

weather cold wave cold belgaum

बेळगाव : बेळगावकर गुलाबी थंडीने गारठले; धुक्याची चादर
बेळगाव शहर व परिसरात काही दिवसांपासून थंडी वाढली

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm