बेळगाव : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची धारातीर्थ यात्रा अर्थातच गडकोट मोहीम

बेळगाव : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची धारातीर्थ यात्रा अर्थातच गडकोट मोहीम

belgavkar.com | belgaum | belgavkar

दुर्ग श्रीरायरेश्वर तें श्रीप्रतापगड मार्गे श्रीक्षेत्र महाबळेश्वर ।। धारातीर्थयात्रा (मोहिम) ।।

श्री श्रीरायरेश्वर ते किल्ले श्रीप्रतापगड मार्गे श्री महाबळेश्वर
मोहिमेचा कालावधी - पौष शु ।। 14 ।। तें पौष कृ ।। 3 ।। श्रीशिवशक 350 म्हणजेच बुधवार, दिनांक 24 जानेवारी 2024 तें रविवार, दिनांक 28 जानेवारी 2024 पर्यंत.

मोहिमेचे प्रारंभस्थान- दुर्ग श्रीरायरेश्वर, ता. वाई, जि. सातारा.

श्रीरायरेश्वराच्या पायथ्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग - आपापल्या सोईनुसार भोर किंवा वाई मार्गे श्रीरायरेश्वराच्या पायथ्यापर्यंत पोहोचावे. आपली वहाने गडाखालीच सोडावीत.
प्रारंभस्थानीं पोहोचण्याची वेळ - संपूर्ण दुर्ग पाहण्यासाठी बुधवार, दि. 24 जानेवारी 24 रोजी दुपारी 1.00 वाजण्याच्या आत श्रीरायरेश्वरावर पोहोचावे. हा दिवस गडदर्शनासाठीं आहे.

मोहिमेची प्रारंभ वेळ बुधवारी, दिनांक 24 जानेवारी 2024 या दिवशीं, सायंकाळी ठिक 5.30 वाजतां, श्रीतुळजामातेच्या आरतीनें मोहिमेचा शुभारंभ होईल.
बेळगाव : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या रक्तगटाचे तरुण घडवणार्‍या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची धारातीर्थ यात्रा अर्थातच गडकोट मोहीम होणार आहे. छत्रपती शिवाजी व संभाजी महाराज यांच्या विचारांची निस्वार्थी, देशभक्त पिढी घडवण्यासाठी ही गडकोट मोहीम असणार आहे. तरुण पिढीला ध्येयवादी बनवण्यासाठी तसेच त्यांच्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवण्यासाठी शिवप्रतिष्ठानतर्फे गेली काही वर्षे गडकोट मोहिमेचे आयोजन केले जाते. छत्रपती शिवाजी महाराज पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि हुतात्मे, स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाने धारातीर्थे बनलेल्या गडकोटांच्या मोहिमात प्रतिवर्षी हजारो कार्यकर्ते सहभागी होतात. मोहिमेची पूर्वसिद्धता म्हणून प्रत्येक धारकर्‍याने नित्य पळणे, जोर-बैठका, सूर्यनमस्कार असा व्यायाम तात्काळ चालू करावा, तसेच ‘राजा श्रीशिवछत्रपती’ ग्रंथाचे नित्य वाचन चालू करावे. खडतर अशा मार्गातून दर्‍याखोर्‍यांमधून, खाचाखळण्यांमधून, उघड्यावर झोपणे, अविश्रांत चालणे, ऊन-वारा यांची तमा नाही. चार दिवस सर्व थरांमधील धारकरी एक येतात. त्यामुळे या मोहिमेची प्रत्येक धारकरी-शिवप्रेमी आतुरतेने वाट पहात असतात. अखेर या मोहिमेची घोषणा झाल्यामुळे धारकर्‍यांमध्ये नवचैतन्य संचारले आहे.

belgaum Shivpratisthan Hindustan Gadkot Mohim SP Bhide Guruji belgavkar बेळगाव belgaum

belgaum Shivpratisthan Hindustan Shivpratisthan Hindustan Gadkot

Shivpratisthan Hindustan Gadkot Mohim SP Bhide Guruji belgaum

belgaum Shivpratisthan Hindustan Shivpratisthan Hindustan Gadkot

बेळगाव : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची धारातीर्थ यात्रा अर्थातच गडकोट मोहीम
दुर्ग श्रीरायरेश्वर तें श्रीप्रतापगड मार्गे श्रीक्षेत्र महाबळेश्वर ।। धारातीर्थयात्रा (मोहिम) ।।

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm