कर्नाटकातील त्या विद्यार्थ्यांना सेप्टिक टँक साफ करायला लावलं;

कर्नाटकातील त्या विद्यार्थ्यांना सेप्टिक टँक साफ करायला लावलं;

belgavkar.com | belgaum | belgavkar

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुख्याधापक आणि शिक्षकाला अटक

कर्नाटकातील दलित विद्यार्थ्यांना शौच टाकी स्वच्छ करायला लावल्याप्रकरणी शाळेचे मुख्याधापक आणि एका शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. कर्नाटकमधील कोलारच्या मोरारजी देसाई शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला त्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली
शाळा प्रशासनाकडून दलित विद्यार्थ्यांना शाळेतील शौच टाकी साफ करण्यास लावल्याचा एक व्हिडिओ समोर आला होता. त्यानंतर मुख्याध्यापक आणि एका शिक्षकाला अटक करण्यात आली. तसेच शाळेतील चार कंत्राटी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. याच शाळेतील आणखी एक व्हिडिओ समोर आलाय. ज्यात विद्यार्थ्यांना जड स्कूलबँग पाठीवर ठेवून रांगायला लावलं जात आहे.
मोरारजी देसाई शाळेत एकूण 243 विद्यार्थी आहेत. यात 19 मुलींचा देखील समावेश आहे. सर्व विद्यार्थी 6 वी ते 9 वीच्या वर्गातील आहेत. आरोपांनुसार चार विद्यार्थ्यांना शौच टाकीमध्ये उतरून हाताने टाकी साफ करण्याची शिक्षा सुनावण्यात आली होती. हाताने नाली किंवा टाकीची स्वच्छता करण्यावर भारतात तीन दशकांपासून बंदी आहे. असे असले तरी आजही अशाप्रकारची सफाई देशात पाहायला मिळते. टाकीमध्ये उतरल्याने श्वास गुदमरुन देशात अनेक कामगारांचा मृत्यू झालाय. कर्नाटकमध्ये विद्यार्थ्यांना अशी शिक्षा देण्यात आल्याने त्यांचा जीव धोक्यात टाकण्यात आल्याचं स्पष्ट आहे. तसेच समाजाची मानसिकता अद्याप बदलली नाही याचे हे निदर्शक आहे.
सदर घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त केला जात आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामया यांनी याप्रकरणी दखल घेतलीये. त्यानंतर मुख्याध्यापक आणि शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांना सेवेतून निलंबन करण्यात आले आहेत. याप्रकरणी अधिक तपास केला जाणार आहे.

School staff booked in Karnataka for making Dalit students clean septic tank

School principal teacher arrested for forcing students to clean septic tank in Karnataka

Students clean school septic tank; principal teacher held in Kolar district

SC students made to clean septic tank in Karnataka school

कर्नाटकातील त्या विद्यार्थ्यांना सेप्टिक टँक साफ करायला लावलं;
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुख्याधापक आणि शिक्षकाला अटक

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm