Single-use plastic water bottles banned at govt officesbanning the use and supply of single-use plastic water bottles in official meetings, functions and government officesबेळगाव—belgavkar—belgaum : प्लास्टिकमुळे आरोग्य आणि पर्यावरणावर होणाऱ्या गंभीर परिणामांचा विचार करून राज्य शासनाने एकदा वापरात येणाऱ्या (सिंगल यूज) प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्यांवर सरकारी कार्यालयांत तसेच कार्यक्रमांत बंदी घातली आहे. याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code
सर्व सरकारी कार्यक्रम, प्राधिकरण, महामंडळ, सरकारी विद्यापीठ, सरकारी तसेच अनुदानित संस्थांच्या शाळा, महाविद्यालयांच्या कार्यक्रमांत सिंगल यूज प्लास्टिक बाटल्यांवर बंदी असेल. त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित संस्था आणि कार्यालय प्रमुखांवर असेल.
कार्यक्रमांवेळी बाटल्यांऐवजी प्लास्टिकव्यतिरिक्त इतर वस्तूंपासून बनवलेले ग्लास, बाटल्यांतून पाणीपुरवठा करावा. सर्व खातेप्रमुखांनी नोंद घ्यावी. आपल्या कार्यक्षेत्रात आदेशाची अंमलबजावणी करावी, असे आदेशात म्हटले आहे.
