बेळगाव—belgavkar—belgaum : सौंदत्ती-यल्लम्मा देवस्थान परिसराच्या विकासासाठी राज्य व केंद्र सरकारकडून निधीची तरतूद करण्यात आली आहे. विकासाचा मास्टर प्लॅन तयार करण्यात येणार असून तिरुपती तिरुमल देवस्थानाप्रमाणेच विकास केला जाईल, अशी माहिती कायदा व पर्यटन मंत्री एच. के. पाटील यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेत दिली.
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code
मंत्री पुढे म्हणाले, कर्नाटकसह महाराष्ट्र, गोवा राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या रेणुकादेवी मंदिर परिसरामध्ये विकासकामे राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी सरकारकडून विशेष निधीची तरतूद करण्यात आली आहे. केंद्र सरकारकडूनही 100 कोटी, तर प्रसाद योजनेतंर्गत 20 कोटी रु. मंजूर झाले आहेत.
रेणुकादेवी मंदिर परिसरात राबविण्यात येणाऱ्या विविध कामासंदर्भात माहिती वेबसाईटच्या माध्यमातून प्रसारित केली जाणार आहे. त्याचबरोबर जनतेकडून येणाऱ्या सूचनांचीही दखल घेऊन त्यामध्ये सुधारणा करण्यात येईल सौंदत्तीबरोबरच जिल्ह्यातील इतर पर्यटन स्थळांचाही विकास केला जाईल, असेही मंत्र पाटील म्हणाले.
माघ पौर्णिमेसाठी तयारी : माघ पौर्णिमा 12 फेब्रुवारीला असून त्यादिवशी दहा लाखांहून अधिक भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यासाठी चोख व्यवस्था करण्यात आली आहे. वसतिगृहे, स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात येईल. डिजिटल स्क्रीन आणि कॅमेरेदेखील बसवण्यात येणार आहेत, अशी माहितीही मंत्र्यांनी दिली. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, पर्यटन खात्याच्या सहसंचालिका सौम्या बापट, जिल्ह पोलिसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद, पर्यटन खात्याच्या उपसंचालक मोगेर आदी उपस्थित होते.
रोप-वे उभारण्याबाबत विचारजोगनभावी मंदिरापासून मंदिरापर्यंत रोपवे उभारण्याबाबत विचार सुरु आहे. यासाठी खासगी संस्थांकडून निविदा मागविण्यात आल्या आहेत. सर्व प्रकारची तपासणी करून निर्णय घेण्यात येईल, अशी माहितीही मंत्री पाटील यांनी दिली.
