बेळगाव—belgavkar—belgaum : अकोळ (ता. चिकोडी) येथील सद्गुरु बाळूमामा जन्मभूमी सेवा संघातर्फे भंडारा यात्रा दि. 20 व 21 फेब्रुवारी रोजी साजरी होणार आहे. 20 रोजी पहाटे रुद्राभिषेक, सकाळी श्रींची आरती, दुपारी वालंग जमविणे, सायंकाळी भव्य पालखी मिरवणूक, 21 रोजी पहाटे रुद्राभिषेक, सकाळी हत्यार खेळवणे, भगवान आप्पासाहेब डोणे पुजारी महाराज यांची भाकणूक, दुपारी महाप्रसाद वितरण करण्यात येणार आहे.
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code
त्यानंतर श्रीराम हलगी ग्रुप व म्हातार बाबा वालग मंडळाचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी आयोजित ढोलवादन स्पर्धेसाठी अनुक्रमे 15 हजार, 11 हजार, 7000, 5000 रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. यात्रेनिमित्त आयोजित कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन सद्गुरु बाळूमामा जन्मभूमी सेवा संघ व सद्गुरु बाळूमामा युवक कमिटी व भाविकांतर्फे करण्यात आले आहे.
