बेळगाव : गरीब जनतेच्या कष्टाची जाणीव

बेळगाव : गरीब जनतेच्या कष्टाची जाणीव

belgavkar.com | belgaum | belgavkar

महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर

काँग्रेसचे लोकसभा उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांचा प्रचार

बेळगाव—belgavkar—belgaum : गरीब जनतेच्या कष्टाची जाणीव फक्त काँग्रेस पक्षालाच आहे. गरिबांच्या मदतीसाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. आवश्यक निधी पुरविण्यात येत असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली. वंटमुरी कॉलनीत काँग्रेसचे लोकसभा उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांचा प्रचार करण्यात आला. यावेळी मंत्री हेब्बाळकर यांनी प्रचारात भाग घेत मतदारांना आवाहन केले.
त्या म्हणाल्या, काँग्रेस पक्ष हा गरिबांचा पक्ष आहे. त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी जाहीर केलेल्या पंचहमी योजना 100 दिवसांच्या आत लागू करण्यात आल्या. माजी आमदार फिरोज सेट यांच्या कार्यामुळेच वंटमुरी कॉलनीचा विकास झाला आहे, असे त्यांनी सांगितले.
आमदार राजू सेट म्हणाले, लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार निवडून आला पाहिजे. मागील पाच लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभव पत्करावा लागला आहे. यावेळी मृणाल हेब्बाळकर यांचा विजय निश्चित आहे. काँग्रेसला यावेळी चांगली संधी आहे. तुमची सेवा करण्यासाठी काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा द्या, असे आवाहन त्यांन केले. उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांनीही मनोगत व्यक्त केले. ***———*** ***————*** ***—————*** Belgaum Loksabha belgav belagavi belgavkar explore digital india

Congress Candidate Mrinal Hebbalkar Campaigning Belgaum Loksabha

Mrinal Hebbalkar Campaigning

Congress Candidate Mrinal Hebbalkar

बेळगाव : गरीब जनतेच्या कष्टाची जाणीव
महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm