मुलगा खोलीत तर बाप स्टोअर रुममध्ये बोलवायचा... Prajwal Revanna ‘sex scandal’ @कर्नाटक

मुलगा खोलीत तर बाप स्टोअर रुममध्ये बोलवायचा... Prajwal Revanna ‘sex scandal’ @कर्नाटक

belgavkar.com | belgaum | belgavkar

माजी पंतप्रधानांच्या नातवाचे सेक्स स्कँडल;
लैंगिक शोषणाचे हजारो व्हिडिओ व्हायरल

कर्नाटक : माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू आणि हासनचा खासदार प्रज्वल रेवन्ना याच्या कथित सेक्स स्कँडलचे वृत्त समोर आल्यानंतर कर्नाटकात मोठा वाद निर्माण झाला आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा डॉ. नागलक्ष्मी यांच्या पत्रानंतर कर्नाटक सरकारने रविवारी या कथित घोटाळ्याच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. दरम्यान, पीडित महिला रेवण्णा कुटुंबाची नातेवाईक आहे आणि ती त्यांच्यासाठी स्वयंपाकी म्हणून काम करत होती. तिने आरोप केला आहे की, पिता-पुत्राने सतत 4 वर्षे आपले लैंगिक शोषण केले, असे पीडितेने आपल्या एफआयआरमध्ये म्हटले आहे.
पीडितेने एचडी रेवन्ना आणि त्यांचा खासदार मुलगा प्रज्वल रेवन्ना यांच्याविरुद्ध होलेनरसीपूर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. माजी पंतप्रधान देवेगौडा यांचा मुलगा एचडी रेवन्ना होलेनरसीपूरमधून आमदार आहे, तर एचडी रेवन्ना यांचा मुलगा प्रज्वल रेवन्ना हासन मतदारसंघातून खासदार आहे. पीडित महिला एचडी रेवण्णा यांची पत्नी भवानी यांची नातेवाईक आहे. तिने तक्रारीत म्हटले आहे की, 2019 मध्ये रेवन्नाचा मुलगा सूरजच्या लग्नात तिला कामावर बोलावण्यात आले होते. लग्नानंतरही ती तेथेच काम करत होती. प्रज्वल रेवन्ना हा तिला वारंवार खोलीत बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार करत असे, असे पीडितेने म्हटले आहे.
रेवण्णा यांच्या घरात सहा महिला काम करायच्या. प्रज्वल रेवण्णा घरात आल्यावर सगळ्या बायका घाबरायच्या. तो सर्वांना खोलीत बोलावून त्यांचा विनयभंग करत असे. घरात काम करणाऱ्या पुरुषांनी त्यांना प्रज्ज्वलबाबत सावध केले होते, असा आरोप पीडितेने केला आहे. एफआयआरनुसार, पीडितेने सांगितले की, महिला स्वयंपाकघरात काम करत असताना प्रज्वल मागून येऊन त्यांना पकडून मिठी मारत असे. पीडितेने सांगितले की, एचडी रेवन्ना पत्नी घराबाहेर पडताच हुरळून जायचा. तो तिच्यासह घरात काम करणाऱ्या महिलांना स्टोअर रूममध्ये बोलावत असे. फळ देण्याच्या बहाण्याने ते इकडे तिकडे हात लावायचा. साडीच्या पिन काढून लैंगिक अत्याचार करायचा.
पीडितेने सांगितले की, नुकतेच लैंगिक शोषणाचे हजारो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ती घाबरली होती. तिचा नवराही तिच्यावर संशय घेऊ लागला. त्यानंतरच तिने एफआयआर नोंदवण्याचे धाडस दाखवले. दरम्यान, एका पेन ड्राईव्हमध्ये लैंगिक शोषणाचे जवळपास तीन हजार व्हिडिओ समोर आले आहेत. व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती प्रज्वल रेवन्ना असल्याचे सांगण्यात आले आहे.

Prajwal Revanna ‘sex scandal’

Prajwal Revanna sex videos case

मुलगा खोलीत तर बाप स्टोअर रुममध्ये बोलवायचा... Prajwal Revanna ‘sex scandal’ @कर्नाटक
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे सेक्स स्कँडल; लैंगिक शोषणाचे हजारो व्हिडिओ व्हायरल

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm