Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर

Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर

belgavkar.com | belgaum | belgavkar

India announce squad for Men's T20 World Cup 2024

India T20 World Cup squad : Pant returns;
हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट;

T20 World Cup 2024 : 1 जूनपासून ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेला सुरुवात होणार आहे. वेस्ट इंडिज आणि अमेरिका यांच्याकडे वर्ल्ड कपचे संयुक्त यजमानपद दिले गेले आहे.  या स्पर्धेसाठी सर्व 20 संघ पात्र ठरले आहेत आणि पहिला सामना अमेरिका विरुद्ध कॅनडा यांच्यात होईल. भारत-पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात 9 जून 2024 मध्ये न्यू यॉर्क येथे हाय व्होल्टेज सामना होणार आहे. निवड समिती प्रमुख अजित आगरकर, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड व कर्णधार रोहित शर्मा यांच्यात रविवारी 28 एप्रिलला दिल्लीत बैठक झाली. त्यानंतर आगरकरने अहमदाबाद येथे बीसीसीआय सचिव जय शाह यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. 
हार्दिक पांड्याच्या निवडीवरून या बैठकीत भरपूर चर्चा झाली. रोहित शर्मासोबत सलामीला यशस्वी जैस्वाल याचे स्थान पक्के होते. विराट कोहली, सूर्यकुमार यादव हेही पक्के होते. यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून रिषभ पंत फ्रंट रनर असला तरी दुसरा यष्टिरक्षक म्हणून संजू सॅसमन व लोकेश राहुल यांच्याबाबत चर्चा केली गेली.  संजू सॅमसनने बाजी मारली. हार्दिककडून उप कर्णधारपद काढून घेतलं जाईल अशी चर्चा होती, परंतु याला आज पूर्णविराम मिळाला. हार्दिकने संघातील जागा कायम राखलीच, शिवाय उप कर्णधारपदही टिकवलं आहे. आयपीएल गाजवणाऱ्या शिवम दुबेला संधी देण्याचा योग्य निर्णय निवड समितीने घेतला आहे.
युझवेंद्र चहल व कुलदीप यादव ही जोडी पुन्हा प्लेइंग इलेव्हनमध्ये दिसणार आहे. संजूच्या मेहनतीला यश मिळालं आहे.  भारताचा वर्ल्ड कप संघ - रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उप कर्णधार), विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह
राखीव खेळाडू - शुबमन  गिल, रिंकू सिंग, आवेश खान, खलिल अहमद 

India T20 World Cup squad

India announce squad for Mens T20 World Cup 2024

T20 World Cup 2024

Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर
India announce squad for Men's T20 World Cup 2024

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm