मुख्यमंत्री महिलांच्या कपड्यांकडेच बघत असतात, कारण काय?

मुख्यमंत्री महिलांच्या कपड्यांकडेच बघत असतात, कारण काय?

belgavkar.com | belgaum | belgavkar

माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचा नितीश कुमारांवर पलटवार

पूर्वी कोणी कपडे घालून चालायचे, आता बघा किती छान दिसतात. चुकून जरी या लोकांना मत दिले, तर तुम्ही बरबाद व्हाल, असे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नुकतेच एका निवडणूक रॅलीत महिलांकडे बोट दाखवत म्हटले होते. त्यावर मुख्यमंत्री नितीश कुमार हे महिलांच्या कपड्यांकडे बघत राहतात, त्यांना महिलांच्या विषयामध्ये इतके कुतूहल का, अशी टीका करत माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांनी पलटवार केला आहे.
त्यांनी म्हटले की, नितीश कुमार यांनी कुणाच्या कपड्यात डोकावण्यापेक्षा बिहारच्या लोकांचे दुःख, त्रास आणि समस्या पाहिल्या असत्या, तर बरे झाले असते. नितीश हे महिलांना अपमानीत करत आहेत. तुम्ही अतिशय जबाबदारीच्या आणि महत्त्वाच्या पदावर आहात याचे भान ठेवा, असे राबडीदेवींनी म्हटले आहे.
इतके कुतूहल? : घर असो, रस्ता असो, की निवडणुकीचे व्यासपीठ, मुख्यमंत्री, सर्व कामे सोडून महिला काय करतात? ती ओढणी घेते का? मुलांना जन्म देतात का? यावर लक्ष ठेवतात. त्यांना महिलांच्या विषयांमध्ये इतके कुतूहल का आहे?
अस्मितेला धक्का लावू नका : तुम्हाला तुम्हाला राजकीय रा विरोध करायचा असेल, तर आणि वस्तुस्थितीने करा, तुमच्या संकुचित तर्क विचारसरणीने आणि जिभेने महिलांच्या अस्मितेला धक्का लावू नका, असे राबडीदेवी यांनी म्हटले आहे. राबडीदेवी यांनी 42 सेकंदांचा व्हिडीओही शेअर केला आहे. यात मुख्यमंत्री मंचावर उपस्थित महिला नेत्याकडे पाहून म्हणतात की, पूर्वी काहीतरी मिळायचे, काहीतरी व्यवस्थित परिधान करायच्या. या व्हिडीओमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या भाषणातील काही अंश आहे. यात ते नितीश कुमार यांच्या वक्तव्याचा समाचार घेत आहेत.

Rabri Devi attack on CM Nitish Kumar on cloths statement

CM Nitish Kumar on cloths statement

मुख्यमंत्री महिलांच्या कपड्यांकडेच बघत असतात, कारण काय?
माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचा नितीश कुमारांवर पलटवार

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm