बेळगाव जिल्ह्यातील आमदाराची मतदारांना धमकी

बेळगाव जिल्ह्यातील आमदाराची मतदारांना धमकी

belgavkar.com | belgaum | belgavkar

Will Disconnect Electricity If We Don't Get Votes;
“मतं दिली नाहीत तर…”

No Vote, No Electricity' : Karnataka Congress MLA

बेळगाव-कागवाड : सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. मतदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी वेगवेगळे पक्ष आणि उमेदवार जनतेला मोठमोठी आश्वासनं देत आहेत. प्रचारसभा, सेलिब्रेटींच्या प्रचारफेऱ्या, आश्वासनं, जाहिरातींच्या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर काही ठिकाणी मतदारांना आपल्या बाजूने वळवण्याच्या प्रयत्नात उमेदवार आणि नेते आचारसंहितेचं उल्लंघन करत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. असाच एक प्रकार बेळगाव येथे घडला आहे.
बेळगावी जिल्ह्यातील कागवाडचे काँग्रेसचे आमदार राजू कागे यांनी लोकसभेच्या प्रचारादरम्यान केलेल्या भाषणात एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. कागे यांनी एका प्रचारसभेत मतदारांना धमकी दिल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आमदार कागे मतदारांना म्हणाले, तुम्ही आमच्या पक्षाला मोठ्या बहुमताने जिंकवलं नाही तर आम्ही तुमच्या घरांचा वीजपुरवठा बंद करू.
राजू कागे म्हणाले, “तुम्ही आम्हाला मत दिलं नाही तर आम्ही तुमची वीज बंद करू आणि मी माझ्या शब्दांवर ठाम आहे.” काँग्रेस आमदार राजू कागे यांच्या या वक्तव्यानंतर भाजपाने त्यांच्यावर आणि काँग्रेसवर टीका केली आहे. भाजपा प्रवक्ते शहजाद पूनावाला म्हणाले, या काँग्रेसकडे ‘मोहब्बत की दुकान’ नाही. ते तर ‘धमकीचे भाईजान’ आहेत. शहजाद म्हणाले, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी मागील निवडणुकीत मतदारांना इशारा दिला होता की, मतदारांनी त्यांच्या भावाला मतं दिली नाहीत तर त्यांची कामं (विकासकामं) केली जाणार नाहीत.

No Vote No Electricity Karnataka Congress MLA Warns Voters Raju Kage Kagwad

No Vote No Electricity Raju Kage Kagwad

बेळगाव जिल्ह्यातील आमदाराची मतदारांना धमकी
Will Disconnect Electricity If We Don't Get Votes; “मतं दिली नाहीत तर…”

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm