“उद्या जर नरेंद्र मोदीचं निधन…” बेळगावमधील आमदाराचे खळबळजनक विधान

“उद्या जर नरेंद्र मोदीचं निधन…” बेळगावमधील आमदाराचे खळबळजनक विधान

belgavkar.com | belgaum | belgavkar

जाहीर सभेत मोदींवर आक्षेपार्ह भाषेत टीका

विशेष म्हणजे ते भाजपामध्येच होते. 2019 साली काँग्रेसमध्ये

बेळगाव : निवडणुकीच्या प्रचार सभेत बोलताना कधी कधी नेत्यांचा तोल ढासळतो आणि ते नको असलेले विधान बोलून बसतात. कर्नाटकमध्ये एका काँग्रेस नेत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या एका विधानामुळे सध्या वाद निर्माण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मृत्यू झाला तर काय होईल? असे विधान या नेत्याने केले आहे. या विधानानंतर कर्नाटक भाजपाने काँग्रेसवर टीका केली आहे. काँग्रेस नेते पंतप्रधान मोदींच्या मरणाची वाट पाहत आहेत, असाही आरोप भाजपाने केला आहे.
Karnataka Congress MLA Raju Kage Stokes Controversy With 'If PM Modi Dies' Remark
बेळगाव जिल्ह्यामधील कागवाडचे काँग्रेसचे आमदार राजू कागे यांनी भाजपा आणि जे तरुण मोदींचा जयघोष करतात त्यांच्यावर टीका करताना पंतप्रधान मोदींच्या मृत्यूबाबत विधान केलं. ते म्हणाले, “मी पदवीधर असून मला बुद्धी आहे. मी निरक्षर नाही. मीदेखील देश चालवू शकतो, इतका आत्मविश्वास माझ्यात आहे. जर उद्या मोदींचा मृत्यू झाला तर कुणीच पंतप्रधान होणार नाही का? या देशात 140 कोटींची लोकसंख्या आहे. एवढ्या लोकांमध्ये पंतप्रधान होऊ शकणारा एकही व्यक्ती नाही का?”
काँग्रेस नेते पंतप्रधानांच्या निधनाची वाट पाहतायत : आमदार राजू कागे यांच्या या टीकेनंतर भाजपाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. भाजपाने आपल्या पक्षाच्या एक्स अकाऊंटवर राजू कागे यांचा व्हिडीओ शेअर करून काँग्रेसचे नेते पंतप्रधानांच्या मरणाची वाट पाहत आहेत? अशी टीका केली. राजू कागे यांनी पहिल्यांदाच वादग्रस्त विधान केले आहे, असे नाही. याआधीही त्यांची अनेक विधाने वादग्रस्त ठरली होती. काही दिवसांपूर्वी राजू कागे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या जीवनशैलीवर टीका केली होती. पंतप्रधान मोदी हे महागड्या विमानातून प्रवास करतात, तर त्यांचे कपडे चार लाख रुपयांचे असतात, असा आरोप त्यांनी केला होता. विशेष म्हणजे राहू कागे हे भाजपामध्येच होते. 2019 साली त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

Congress MLA Raju Kage Stokes Controversy With If PM Modi Dies

Congress MLA Raju Kage Stokes

If PM Modi Dies

“उद्या जर नरेंद्र मोदीचं निधन…” बेळगावमधील आमदाराचे खळबळजनक विधान
जाहीर सभेत मोदींवर आक्षेपार्ह भाषेत टीका

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm