बेळगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विरोध #Loksabha

बेळगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विरोध #Loksabha

belgavkar.com | belgaum | belgavkar

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचारासाठी बेळगावमध्ये

बेळगाव—belgavkar : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी बेळगावमध्ये येणार आहेत. एकनाथ शिंदे यांनी सीमाप्रश्नासाठी तुरुंगवास भोगला आहे. त्यांना सीमाप्रश्नाची जाण आहे. त्यामुळे अशा व्यक्तींनी एका कन्नड उमेदवाराच्या प्रचारासाठी येणे टाळावे, अशी मागणी मध्यवर्ती म. ए. समितीच्यावतीने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.
शिंदे हे बेळगावमध्ये म. ए. समितीच्या विरोधातील उमेदवाराच्या प्रचारासाठी येणार असल्याचे समजताच म. ए. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे सीमावासियांचे आधारस्तंभ आहेत. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका सदैव महत्त्वाची ठरली आहे. एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या सान्निध्यात तयार झालेले व्यक्तिमत्त्व असल्याने त्यांनी जवळून सीमाप्रश्न पाहिला आहे. अनेक लढ्यांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असल्याने लढ्याची धार कमी होईल, अशी कृती करू नये, असे पत्र म. ए. समितीकडून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे.
बेळगावसह कारवार मतदारसंघात समितीने उमेदवार दिले आहेत. परंतु मुख्यमंत्री शिंदे म. ए. समितीच्या उमेदवारांच्या विरोधातील उमेदवाराच्या प्रचारासाठी येणार आहेत. त्यामुळे शिंदे यांनी सीमाभागात येणे टाळावे, अशी मागणी मध्यवर्ती समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी केली आहे.

Belgaum CM Eknath Shinde Loksabha Karwar belgavkar बेळगाव belgaum

Belgaum CM Eknath Shinde Loksabha Karwar

CM Eknath Shinde Loksabha belgavkar

CM Eknath Shinde Loksabha Karwar

बेळगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विरोध #Loksabha
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचारासाठी बेळगावमध्ये

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm