Lok Sabha Election 2024 : आधी मिमिक्री अन् आता मोदींविरोधात निवडणूक लढवणार 'हा' कॉमेडियन

Lok Sabha Election 2024 : आधी मिमिक्री अन् आता मोदींविरोधात निवडणूक लढवणार 'हा' कॉमेडियन

belgavkar.com | belgaum | belgavkar

Comedian Shyam Rangeela to fight against PM Modi in Varanasi

Lok Sabha Elections 2024 : Comedian contesting against PM Modi in Varanasi

Varanasi Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Narendra Modi) नक्कल करुन प्रसिद्ध झालेला कॉमेडियन श्याम रंगीला वाराणसीतून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. श्याम रंगीलाने (Shyam Rangila) एक्स अकाऊंटवरुन मोदींविरोधात निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. कॉमेडी क्षेत्रात राजकारणाचा शिरकाव झाला असून मीही कॉमेडीच्या माध्यमातून राजकारण करु शकतो असं त्यांने म्हटलं आहे. तसेच आपणाला कॉमेडीत हवे तसे काम करता येत नसल्याचा आरोपदेखील त्याने केला आहे.
श्याम रंगीला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची हुबेहूब मिमिक्री करणारा कलाकार म्हणून खूप प्रसिद्ध आहे. मोदींच्या मिमिक्रीमुळे तो सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला होता. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारनेही त्याच्या मिमिक्रीचं कौतुक केलं होतं. याच श्याम रंगीलाने (Shyam Rangila) निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली असून त्याने थेट पंतप्रधान मोदींच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याचं घोषीत केलं आहे. त्यामुळे आता वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात श्याम रंगीलाची उमेदवारी अशी लढत पाहायला मिळू शकते.
श्याम रंगीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राहुल गांधी यांचीदेखील मिमिक्री करतो. नेत्यांची मिमिक्री केल्यामुळे तो खूप फेमस झाला होता. मात्र काही दिवसांनी त्याच्या मिमिक्रीवर बंधन घालण्यात आली होती. याच कारणामुळे आता त्याने मोदींविरोधात शड्डू ठोकला आहे. कारण श्यामने निवडणूक लढवण्याचं कारणच त्याच्या मिमिक्रीवर घालण्यात आलेलं बंधन हे असल्याचं सांगितलं.
लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे पार पडले आहेत. शिवाय याआधी सूरत आणि इंदूरमधील उदाहरण देत त्याने म्हटलं, 'लोकशाही धोक्यात नाही हे दाखवण्यासाठी मी ही निवडणूक लढवत आहे. वाराणसीत लोकांना माझ्या रुपाने मतदानासाठी पर्याय उपलब्ध व्हावा आणि निदान इथे (Varanasi Lok Sabha Constituency) सूरत किंवा इंदूरसारखी स्थिती निर्माण होऊ नये यासाठी मी ही निवडणूर लढवत आहे.' सूरत आणि इंदूर या दोन लोकसभा मतदारसंघांतून दोन्ही उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे भाजप तिथे जिंकणार असल्याचं जवळपास फायनल झालं आहे.

Comedian Shyam Rangeela to fight against PM Modi in Varanasi

Lok Sabha Elections 2024

Shyam Rangeela comedian contesting against PM Modi in Varanasi

Lok Sabha Election 2024 : आधी मिमिक्री अन् आता मोदींविरोधात निवडणूक लढवणार 'हा' कॉमेडियन
Comedian Shyam Rangeela to fight against PM Modi in Varanasi

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm