कर्नाटक : 2 महिलांकडून अंतर्वस्त्रातून 50 लाखांचे सोने जप्त

कर्नाटक : 2 महिलांकडून अंतर्वस्त्रातून 50 लाखांचे सोने जप्त

belgavkar.com | belgaum | belgavkar

Two women caught smuggling gold at airport

Kempegowda International Airport (KIA)

कर्नाटक-बंगळूर : येथील केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Kempegowda International Airport) 2 महिलांकडून ₹ 50 लाखांचे 718 ग्रॅम सोने जप्त करण्यात आले. दुबईहून बंगळूरला आलेल्या इंडिगो विमानातून (Indigo Airlines) दोन भारतीय महिला विमानतळावर उतरल्या.
महसूल विभागाच्या (Revenue Department) गुप्तचर अधिकाऱ्यांनी त्या दोन महिलांना अडविले. शंका आल्यानंतर त्यांना कस्टम अधिकाऱ्यांकडे सोपविले. अधिकाऱ्यांनी त्यांची कसून तपासणी केली.
त्यावेळी अधिकाऱ्यांना दोन्ही महिला (Women) अंतर्वस्त्रातून 718 ग्रॅम सोन्याची तस्करी करत असल्याचे आढळून आले. सोने दोन्ही महिला अंतर्वस्त्रातून तस्करी करत होत्या. दोन्ही महिलांनी ताब्यात घेण्यात आले असून, त्यांची चौकशी सुरू केली आहे.

Two women caught smuggling gold at airport

Kempegowda International Airport KIA

कर्नाटक : 2 महिलांकडून अंतर्वस्त्रातून 50 लाखांचे सोने जप्त
Two women caught smuggling gold at airport

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm