'जीव दे' म्हटलं म्हणून एखाद्याने खरंच जीवन संपवलं तर काय? कर्नाटक हायकोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

'जीव दे' म्हटलं म्हणून एखाद्याने खरंच जीवन संपवलं तर काय?
कर्नाटक हायकोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

belgavkar.com | belgaum | belgavkar

Statements such as ‘go hang yourself’ alone will not amount to abetment of suicide : Karnataka High Court

कर्नाटक : आत्महत्येच्या प्रकरणामध्ये कर्नाटक हायकोर्टाने महत्त्वाची टिप्पणी केली आहे. एखाद्याला जीव देण्यास म्हटलं म्हणजे त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे मानलं जाऊ शकत नाही, असं कोर्टाने म्हटलं आहे. याप्रकरणी कोर्टाने याचिकाकर्त्याला दिलासा देत त्याच्यावरील कारवाई रद्द केली आहे. न्यायमूर्ती एम नागप्रसन्ना यांनी याप्रकरणी सुनावणी घेतली (Karnataka High Court quashes suicide abetment case against man who allegedly told priest to 'go hang himself').
याचिकाकर्त्याने कोर्टात म्हटलं होतं की, व्यक्तीला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करण्याचा कोणताही हेतू नव्हता. केवळ दु : खातून तसं वक्तव्य केलं गेलं. हायकोर्टानं म्हटलं की, याचिकाकर्ता आरोपी आहे. त्याची पत्नी आणि चर्चचा फादर यांचे काही संबंध होते, त्यामुळे नाराज असलेल्या पतीने म्हटलं होतं की, जा, जाऊन गळफास लावून घे. याचा अर्थ असा होत नाही की आयपीसीच्या कलम 107 अंतर्गत आणि कलम 306 अंतर्गत याचिकाकर्त्याने आत्महत्येसाठी उकसवलं.
आत्महत्या करण्याचे अनेक कारणे असू शकतात. चर्चचा फादर असून देखील त्याचे याचिकाकर्त्याच्या पत्नीसोबत अवैध लैंगिक संबंध होते, असं हायकोर्टाने म्हटलं आहे. याचिकाकर्त्याने एका ज्यूनियर पादरीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप होता. 11 ऑक्टोबर 2019 रोजी त्याने आत्महत्या केली होती. पादरी हा उड्डपी जिल्ह्यातील एका शाळेचा मुख्याध्यापक देखील आहे. याचिकाकर्त्याने धमकी दिल्यानेच पादरीने आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला होता.
रिपोर्टनुसार, 11 ऑक्टोबर 2019 मध्ये याचिकाकर्त्याने फादरला रात्री फोन केला होता. दोघांमध्ये जवळपास पाच मिनिटे चर्चा झाली. फादरने याचिकाकर्त्याच्या पत्नीला काही मेसेज पाठवले होते. यावरुन याचिकाकर्त्याने त्याला जाब विचारला. तसेच, जाऊन तू गळफास घे असं म्हटलं. त्यानंतर फादरने रात्री बारा वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली होती. पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर दाखल केला होता. यात याचिकाकर्त्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

go hang yourself suicide : Karnataka High Court

Karnataka High Court quashes suicide abetment case

Karnataka High Court

'जीव दे' म्हटलं म्हणून एखाद्याने खरंच जीवन संपवलं तर काय? कर्नाटक हायकोर्टाची महत्त्वाची टिप्पणी
Statements such as ‘go hang yourself’ alone will not amount to abetment of suicide : Karnataka High Court

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm