बेळगाव : सार्वत्रिक रजा घोषित #लोकसभा

बेळगाव : सार्वत्रिक रजा घोषित #लोकसभा

belgavkar.com | belgaum | belgavkar

Lok Sabha Election 2024

बेळगाव—belgavkar : लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया चालणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान 7 मे रोजी होणार आहे. या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी राज्यातील सर्व सरकारी कार्यालये, शाळा, महाविद्यालय आणि व्यावसायिक संघ-संस्था व अन्य सरकारी संस्थांमधील कर्मचाऱ्यांना पगारी रजा घोषित करण्यात आली आहे. बेळगाव, चिक्कोडी आणि कारवार लोकसभा मतदारसंघात 7 मे रोजी मतदान होणार आहे.
लोकसभा निवडणुकीत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी मतदानाच्या दिवशी एक दिवसाची भरपगारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सरकारचे अधीन सचिव विजयकुमार एच. बी. यांनी सदर आदेश दिला आहे. लोकसभा मतदारसंघांच्या कार्यक्षेत्रातील सर्व सरकारी कार्यालये तसेच सरकारी सहभागत्वाखाली असणाऱ्या अन्य संघ-संस्थांतील कर्मचाऱ्यांना रजा घोषित करण्यात आली आहे.
कर्मचाऱ्यांना 7 मे रोजी सार्वत्रिक रजा घोषित करण्यात आली आहे. राज्यात एकूण 28 लोकसभा मतदारसंघ असून यातील पहिल्या टप्प्यात 14 आणि दुसऱ्या टप्प्यांत उर्वरित 14 लोकसभा मतदारसंघांतील मतदान प्रक्रिया तसेच शिरापूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक होणार आहे. या मतदारसंघातील कार्यक्षेत्रात येणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना (मतदारांना) मतदानास अनुकूल ठरावे, यादृष्टीने त्यांना रजा घोषित करण्यात आली आहे.

Belgaum holiday for Lok Sabha Election 2024 belgavkar बेळगाव belgaum

Belgaum holiday for Lok Sabha Election 2024

holiday for Lok Sabha Election 2024 belgavkar

holiday for Lok Sabha Election 2024 belgaum

बेळगाव : सार्वत्रिक रजा घोषित #लोकसभा
Lok Sabha Election 2024

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm