खलिस्तानी दहशतवादी हत्येप्रकरणी 3 भारतीयांना अटक

खलिस्तानी दहशतवादी हत्येप्रकरणी 3 भारतीयांना अटक

belgavkar.com | belgaum | belgavkar

Hardeep Singh Nijjar killing;
Canadian Police arrest 3 Indian nationals

Khalistan separatist Hardeep Singh Nijjar murder case

खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येप्रकरणी कॅनडा पोलिसांनी 3 भारतीय नागरिकांना अटक केली आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये ही माहिती देण्यात आली आहे. कॅनडा पोलिसांना असा संशय आहे की, अटक केलेल्या लोकांना भारत सरकारने गेल्या वर्षी निज्जरला मारण्याची सुपारी दिली होती. माहितीनुसार, तपासकर्त्यांनी काही महिन्यांपूर्वी कॅनडातील संशयितांची ओळख पटवली होती. तेव्हापासून कॅनडा पोलीस त्यांच्यावर कडक पाळत ठेवून होते. अखेर शुक्रवारी (ता. 3) त्यांना अटक करण्यात आली आहे. आता पोलिसांकडून त्यांची कसून चौकशी केली जात आहे.
hardeep-singh-nijjar-killing-canadian-police-release-pictures-of-accused-202405_1.jpeg | खलिस्तानी दहशतवादी हत्येप्रकरणी 3 भारतीयांना अटक | belgaum news | belgavkar बेळगावकर
जून 2023 मध्ये कॅनडातील व्हँकोव्हरमधील एका पार्किंग स्लॉटमध्ये हरदीप सिंग निज्जरची हत्या केली होती. दोन अज्ञात हल्लेखोरानी निज्जर याच्यावर एकापाठोपाठ एक गोळ्या झाडल्या होत्या. ही घटना खलिस्तानी दहशतवाद्यांना कॅनडात आश्रय मिळण्याच्या मुद्द्याला पुन्हा हवा देणारी ठरली. हरदीप सिंग निज्जरच्या हत्येमागे भारतीय एजंटचा हात आहे, असा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी केला होता. त्यांच्या आरोपांनंतर भारत सरकारने कॅनडाच्या उच्चाधिकाऱ्यांची भारतातून हकालपट्टी केली. त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंधांवर निर्बंध आले.
दरम्यान, या हत्येप्रकरणी कॅनडा पोलिसांनी आता तीन भारतीय संशयितांना अटक केली आहे. करणप्रीत सिंग, कमलप्रीत सिंग आणि करण ब्रार, अशी अटक करणाऱ्या आलेल्या भारतीय नागरिकांची नावे आहेत. त्यांच्यावर निज्जरची हत्या करणे, हत्येचा कट रचणे, असे आरोप करण्यात आलेले आहे. न्यायालयाच्या कागदपत्रांवरून तिन्ही संशयित भारतीय नागरिक असल्याचं समोर आलं आहे. वृत्तात संशयितांची ओळख भारतीय नागरिक म्हणून करण्यात आली आहे.

Hardeep Singh Nijjar killing : Canadian police release pictures of accused

Canadian Police arrest 3 Indian nationals in Khalistan separatist Hardeep Singh Nijjar murder case

खलिस्तानी दहशतवादी हत्येप्रकरणी 3 भारतीयांना अटक
Hardeep Singh Nijjar killing; Canadian Police arrest 3 Indian nationals

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm