बेळगाव : बालिकेच्या खून प्रकरणी तिघांना अटक

बेळगाव : बालिकेच्या खून प्रकरणी तिघांना अटक

belgavkar.com | belgaum | belgavkar

आर्थिक देवाणघेवाणीतून मारहाणीत मृत्यू

बेळगाव—belgavkar - अथणी : कोकटनूर येथील काळा पाटील यांच्या मळ्यात 3 वर्षाच्या बालिकेच्या खून प्रकरणी कोडगानूर येथील तिघांना ऐगळी पोलिसांनी अटक त्यांची रवानगी कारागृहात केली आहे. सदर प्रकार दोन कुटुंबातील आर्थिक देवाणघेवाणीतून झाला होता. आठवड्यापूर्वी काळा पाटील आणि बाबर यांच्यामध्ये आर्थिक व्यवहारातून हाणामारीचा प्रकार घडला होता. या हाणामारीत श्रीनिधी काळा पाटील हिचा मृत्यू झाला होता.
ज्योतिबा तुकाराम बाबर (वय 60), युवराज ज्योतिबा बाबर (वय 26), यशवंत उर्फ देवराज ज्योतिबा बाबर (वय 23) यांना याप्रकरणी अटक केली आहे. कोकटनूर येथील कडप्पा काळा पाटील व कोडगानूर येथील ज्योतिबा बाबर यांच्यामध्ये आर्थिक व्यवहार होता. या देवाणघेवाणीतून वादाची ठिणगी पडून बालकाची हत्या करण्यात आली होती.
कोकटनूर येथील काळा पाटील यांनी जोतिबा बाबर (रा. कोडगानूर) यांना चेक दिला होता. मात्र, सदर चेक न वटल्याने दोन्ही कुटुंबात वादावादी झाली. या वादावादीचे रूपांतर हाणामारीत झाले. बाबर कुटंबाने केलेल्या बेदम मारहाणीत श्रीनिधी काळा पाटील हिचा मृत्यू झाला. तसेच दोन्ही कुटुंबातील सदस्य जखमी झाले.
पोलिसांनी सविस्तर तपास करून या तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल करून संशयित म्हणून तिघांना अटक केली होती. सीपीआय रवींद्र नायकवडी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय सुमलता असंगी यांच्या पथकाने ही कारवाई केली

Belgaum Athani Kokatnur Murder Girl belgavkar बेळगाव belgaum

Belgaum Athani Kokatnur Murder Girl

Athani Kokatnur Murder Girl belgavkar

Athani Kokatnur Murder Girl belgaum

बेळगाव : बालिकेच्या खून प्रकरणी तिघांना अटक
आर्थिक देवाणघेवाणीतून मारहाणीत मृत्यू

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm