मुलाच्या प्रचार रॅलीत फायरिंग?

मुलाच्या प्रचार रॅलीत फायरिंग?

belgavkar.com | belgaum | belgavkar

मुलगा करण सिंह याला तिकीट दिलं

भारतीय कुस्ती महासंघाचा माजी अध्यक्ष आणि महिला कुस्तीपटूंसोबत लैंगिक शोषण केल्याच्या आरोपांमुळं वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या ब्रिजभूषण शरण सिंह याचा मुलगा करण सिंह याला भाजपनं नुकतेच कैसरगंज लोकसभा मतदारसंघातून तिकीट दिलं आहे. या करण सिंहच्या ताफ्यामध्ये फायरिंग अर्थात गोळीबार झाल्याचा एक कथित व्हिडिओ व्हायरल झाला होता. पण चौकशीनंतर हा गोळीबार नसून विशिष्ट प्रकारच्या फटाक्यांचा आवाज असल्याचं स्पष्ट झालं आहे.
करणभूषण सिंहची मतदारसंघातील नवाबगंज, तरबगंज या भागातून बेलसर बाजार भागात रॅली सुरु होती. यावेळी ठिकठिकाणी स्वागत समारंभ आयोजित करण्यात आले होते. दरम्यान, रगडगंज बाजार भागात एकामागून एक बंदुकीच्या फायरिंग प्रमाणं उडणारे फटाके फोडण्यात आले. या प्रकारामुळं काही काळ गोंधळ निर्माण झाला. यानंतर जिल्हा निवडणूक अधिकारी नेहा शर्मा यांनी या संपूर्ण प्रकाराची दखल घेत तात्काळ स्वरुपात चौकशीचे आदेश दिले.
निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं की, पोलीस अधिकाऱ्यांमार्फत या प्रकाराची प्राथमिक चौकशी केली. यामध्ये बंदुकीतून फायरिंग न करता फटाखे फोडल्याचं समोर आलं आहे. निवडणूक आदर्श आचारसंहितेनुसार गर्दीच्या ठिकाणी फटाके फोडणे हे देखील आचारसंहितेचं उल्लंघन असतं. त्यामुळं या अनुषंगानं व्हायरल व्हिडिओची देखील सविस्तर चौकशी केली जात असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. याचा संपूर्ण अहवाल आल्यानंतर संबंधितांवर कारवाई केली जाईल असंही सांगण्यात आलं आहे.
पोलीस अधीक्षक विनित जयस्वाल यांनी सांगितलं की, घटनास्थळी असलेल्या पोलिसांच्या टीमनं माहिती दिली की, हवेत उडणारे फटाके यावेळी फोडण्यात आले. ते फटाके एकामागून एक हवेत फुटत असल्यानं गोळीबाराचा भास निर्माण झाला. पण काळजी करण्याचं काहीही कारण नाही, कारण इथं केवळ फटाकेच फोडण्यात आले आहेत.

Firing in Bjp Mp Karan Bhushan Singh Convoy

Bjp Mp Karan Bhushan Singh Convoy

मुलाच्या प्रचार रॅलीत फायरिंग?
मुलगा करण सिंह याला तिकीट दिलं

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm