कर्नाटक : 'सेक्स स्कँडल' प्रकरणात मोठी कारवाई; आमदाराला पोलिसांनी ताब्यात घेतलं

कर्नाटक : 'सेक्स स्कँडल' प्रकरणात मोठी कारवाई;
आमदाराला पोलिसांनी ताब्यात घेतलं

belgavkar.com | belgaum | belgavkar

Kidnapping Case : SIT takes JDS leader HD Revanna taken into custody

Obscene Video Case : Court rejects bail plea of Prajwal Revanna, SIT takes HD Revanna into custody;
खासदाराचे हजारो आक्षेपार्ह व्हिडिओही व्हायरल

Janata Dal (Secular) party leader HD Revanna has been taken into custody by Special Investigation Team (SIT) officials in Karnataka on Sunday
कर्नाटक-हासन : एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळी सुरु आहे, तर कर्नाटकमध्ये सेक्स टेप प्रकरणाने देशभर खळबळ उडवून दिली आहे. कर्नाटकातील भाजपचा मित्रपक्ष असलेल्या जेडीएसचे प्रमुख, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे नातू असलेल्या खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्यावर महिलांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी गंभीर आरोप करण्यात आले आहेत. काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांतील नेत्यांकडून या प्रकरणावरून भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदींवर तुफान हल्ला चढवला जात आहे. आता या प्रकरणी पोलिसांनी अखेर निशाणा साधला आहे. अखेर जेडीएस नेते आमदार एचडी रेवण्णा (JDS leader HD Revanna) यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे.
कर्नाटकच्या हसनमधील जनता दल सेक्युलर (जेडीएस) पक्षाचे खासदार प्रज्वल रेवण्णा आणि त्यांचे वडील एच. डी. रेवण्णा यांच्याविरोधात बलात्कार आणि अपहरणाच्या तक्रारींमुळे अडचणीत मोठी वाढ झाली आहे. या प्रकरणी प्रज्वल यांनी अटकपूर्व जामिनासाठी आणि एच.डी. रेवण्णा यांनी अंतरिम जामिनासाठी याचिका न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. पण न्यायालयाने या दोघांनाही मोठा झटका देतानाच त्यांच्या याचिका फेटाळून लावल्या होत्या. अखेर एचडी रेवण्णा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
रेवण्णा यांनी निवडून आलेल्या प्रतिनिधींच्या विशेष न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती. परंतु लैंगिक छळ, पाठलाग, महिलांचा अपमान करणे आणि गुन्हेगारी धमकावण्याचे आरोप हे जामीनपात्र गुन्हे असल्याचे फिर्यादीच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी याचिका मागे घेतली. अटक होण्याची शक्यता असल्याने शुक्रवारी न्यायालयात हजर झाले नाहीत.
खासदार प्रज्वल रेवण्णा (Prajwal Revanna) हा सेक्स स्कँडल प्रकरणात देश सोडून फरार झाला आहे. तर दुसरीकडे त्यांचे वडील एचडी रेवण्णा यांच्यावर दुसऱ्या नवीन एफआयआरमध्ये रेवण्णाचा जवळचा सहकारी सतीश बब्बाना याने रेवण्णाच्या सांगण्यावरून एका माजी गृहिणीचे दोनदा अपहरण केल्याचा आरोप केला आहे. दिवसेंदिवस जेएडीएसच्या या दोन्ही नेत्यांच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत.
ऐन लोकसभा निवडणुकीत कर्नाटकातील राजकारण तापलं आहे. भारताचे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा (H.D. Revanna) यांचा मुलगा एच. डी. रेवण्णा आणि त्यांचा नातू प्रज्वल रेवण्णा यांच्यावर त्यांच्यासाठी काम करणाऱ्या एका महिलेने लैंगिक शोषणाचा आरोप केल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. याचवेळी खासदार प्रज्वलचे अनेक आक्षेपार्ह व्हिडिओही व्हायरल झाले होते. यानंतर तो देशाबाहेर फरार झाला असून त्याने ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली होती. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शनिवारी एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय जाहीर करताना याचवेळी X वर पोस्ट केली. त्यात सरकारने प्रज्वल रेवण्णा यांच्या अश्लील व्हिडिओ प्रकरणाच्या संदर्भात एक विशेष तपास पथक तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. हासन जिल्ह्यात अश्लील व्हिडिओ क्लिप फिरत आहेत, जिथे महिलांवर लैंगिक अत्याचार झाल्याचे दिसून येत असल्याचे म्हटलं आहे.

Kidnapping case SIT takes JDS leader HD Revanna taken into custody

SIT takes HD Revanna into custody

JDS leader HD Revanna

कर्नाटक : 'सेक्स स्कँडल' प्रकरणात मोठी कारवाई; आमदाराला पोलिसांनी ताब्यात घेतलं
Kidnapping Case : SIT takes JDS leader HD Revanna taken into custody

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm