तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात

तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात

belgavkar.com | belgaum | belgavkar

काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष

Kangana Ranaut knocks Tejasvi Surya in flub

Loksabha Election 2024 : हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून अभिनेत्री कंगना रणौत (भाजपा) निवडणूक लढवत आहे. भाजपाच्या कंगना रणौतसमोर काँग्रसेच्या विरोधात विक्रमादित्य सिंह यांचे आव्हान असणार आहे. आपल्या वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत असणारी कंगना आता निवडणुकीमुळे देखील चर्चेत आलीय. अशातच कंगनाने निवडणकीच्या प्रचारादरम्यान, भाजपच्याच खासदारावर जोरदार टीका केली आहे. भाजप खासदारावर कंगनाने केलेल्या वक्तव्याने आश्चर्य व्यक्त होतंय. मात्र भाजपा उमेदवार कंगनाने बोलण्याच्या ओघात भाजप नेत्याला लक्ष केल्याचं फार उशीरा समोर आलं.
शनिवारी निवडणूक प्रचारादरम्यान कंगनाने हे विधान केलं आहे. विरोधी पक्षांच्या राजकुमारांचा उल्लेख करत त्यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आणि त्यानंतर कंगनाने तेजस्वी सूर्यांचं नाव घेत त्यांना गुंड आणि मासे खाणारा म्हटलं. तेजस्वी सूर्या स्वतः भाजपच्या नेते आणि कर्नाटकातील पक्षाचे खासदारही (बेंगळुरु) आहेत. कंगनाच्या या तेजस्वी सूर्या यांच्यावर केलेल्या टीकेनं आश्चर्य व्यक्त करण्यात येतंय.
मंडी लोकसभा मतदारसंघातील सरकाघाट विधानसभा मतदारसंघात कंगनाने जाहीर सभेला संबोधित केले. 'आपण कुठे येत आहोत आणि कुठे जात आहोत, हे त्यांनाच कळत नाही. अशा बिघडलेल्या राजपुत्रांचा हा पक्ष आहे. मग ते चंद्रावर बटाटे पिकवणारे राहुल गांधी असोत किंवा मासे खाऊन गुंडगिरी करणारे तेजस्वी सूर्य असोत किंवा अखिलेश यादव असतील, जे असे फालतू बोलतात. आपलाही एक राजकुमार आहे, ज्याला भारतात आजवर कोणी ओळखत नव्हते. त्यांना फक्त हिमाचल प्रदेशातच ओळखत होते. पण आता त्याने अशा काही कमेंट केल्या आहेत की ही महिला (कंगना) अपवित्र आहे, मी अपवित्र आहे आणि येथून निघून जावे, असे त्याने मला सांगितले. ही आपल्यासाठी चिंतेची बाब आहे,' असं कंगना म्हणाली.
दुसरीकडे, कंगनाला तेजस्वी सूर्या यांच्या ऐवजी राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव (बिहार) याचं नाव घ्यायचं होतं. तेजस्वी यादव यांनी काही दिवसांपूर्वीच निवडणूक प्रचारादरम्यान, मासे खात असल्याचा व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडिओ त्यांनी चैत्र नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी शेअर केला होता, ज्यामुळे यादव यांच्यावर बरीच टीका झाली होती. पण इकडे कंगनाने बोलण्याच्या ओघात तेजस्वी यादव यांच्याऐवजी तेजस्वी सूर्या यांचे नाव घेतलं.  

Kangana Ranaut knocks Tejasvi Surya in flub

Kangana Ranaut takes aim at Tejasvi Surya

तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात
काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm