जगभरात काही भन्नाट आणि धोकादायक विक्रमही केले जातात. आपल्याच देशातील एका माणसानेही आता असा विक्रम केला असून त्याची नोंद गिनिज बुकमध्येही झाली आहे. अर्थात त्याची नक्कल करण्याचा प्रयत्न कुणीही करू नये कारण ते धोकादायक ठरू शकते.
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code
तेलंगणातील सूर्यापेट येथील या व्यक्तीने फक्त 60 सेकंदात त्याच्या जिभेने 57 फिरते इलेक्ट्रिक पंखे थांबवून हा विक्रम नोंदवला आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने शेअर केलेला व्हायरल व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. 1 मिनिट 29 सेकंदाच्या व्हिडीओला कॅप्शनमध्ये असे म्हटले आहे की, “क्रांती ड्रिलमन याने बहुतेक इलेक्ट्रिक पंख्याचे पाते एका मिनिटात जिभेने बंद केले.” मानवी जीभ आठ स्नायूंनी बनलेली असते जी जिभेचा आकार बदलण्यासाठी आणि अनेक कार्ये करण्यासाठी एकत्र काम करतात.Please click here to Watch Video or Photo on X (Twitter)
क्रांती कुमार पणिकेरा नावाचा हा माणूस “ड्रिल मॅन” म्हणून प्रसिद्ध आहे. पानिकेराने वेगाने फिरणार्या ब्लेडला थांबवण्यासाठी जिभेचा धक्कादायक वापर केला आहे. व्हायरल व्हिडीओला दशलक्ष व्ह्यूज, हजार लाईक्स आणि असंख्य कमेंटस् मिळाल्या आहेत. सोशल मीडिया वापरकर्त्यांनी यावर अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या
