आमदाराच्या स्वीय सहाय्यकाला ट्रकनं उडवलं, भीषण अपघातात मृत्यू

आमदाराच्या स्वीय सहाय्यकाला ट्रकनं उडवलं, भीषण अपघातात मृत्यू

belgavkar.com | belgaum | belgavkar

महाराष्ट्र : ठाण्यामधून मोठी बातमी समोर येत आहे. शहापूरचे राष्ट्रवादीचे आमदार दौलत दरोडा यांचे स्वीय सहाय्यक (PA) प्रशांत भोईर यांचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये प्रशांत भोईर यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
भिवंडी जवळ रस्ता क्रॉस करत असताना एका ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. या घटनेत ते गंभीर जखमी झाले. अपघातामध्ये गंभीर दुखापत झाल्यानं त्यांचा मृत्यू झाला, त्यांच्या मृत्यूनं हळहळ व्यक्त होत आहे.
प्रशांत भोईर 2019 पासून आमदार दौलत दरोडा यांचे स्वीय सहायक म्हणून काम पाहात होते. त्यांच्या अचानक जाण्याने शहापूर तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Accident NCP MLA Daulat Daroda PA Personal Assistant Prashant Bhoir

Accident NCP MLA Daulat Daroda PA

आमदाराच्या स्वीय सहाय्यकाला ट्रकनं उडवलं, भीषण अपघातात मृत्यू

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm