बेळगावमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, रिक्षा चालकानं (कॅब) केलेल्या हल्ल्यामध्ये माजी आमदाराचा मृत्यू झाला आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. गोव्यातील माजी आमदार लवू मामलेदार (वय 69) यांचा शनिवारी (दि. 15 फेब्रुवारी) रोजी बेळगाव येथे मृत्यू झाला. त्यांच्या अचानक निधनानं राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी तातडीनं प्रतिक्रिया देत शोक व्यक्त केला.
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code

माजी आमदार आणि गोवा पोलीस दलातील माजी अधिकारी लवू मामलेदार यांच्या आज बेळगाव येथे झालेल्या अकाली निधनाने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या जाण्यानं एक तळमळीचा नेता आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी हरपल्याची भावना प्रमोद सावंत यांनी व्यक्त केलीय. लवू मामलेदार यांनी पोलिस सेवेत असताना राज्याच्या सुरक्षिततेसाठी मोठं योगदान दिलं होतं. त्यानंतर राजकारणात प्रवेश करून त्यांनी जनतेच्या सेवेसाठी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केलं. त्यांचे कार्य कायम स्मरणात राहील, असं प्रमोद सावंत म्हणालेत. लवू मामलेदार यांच्या मृत्यूच्या घटनेच्या सखोल चौकशीसाठी राज्य प्रशासन बेळगावातील स्थानिक अधिकाऱ्यांशी सतत समन्वय साधत असल्याचं मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले.
Please click here to Watch Video or Photo on X (Twitter)
लवू मामलेदार यांच्या त्यांच्या निधनानं गोव्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला आहे. दुपारी 1 ते 1.30 च्या दरम्यान बेळगावमधील एका स्थानिक रिक्षा चालकासोबत झालेल्या वादानंतर लवू अस्वस्थ झाले आणि यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती उघड झाली आहे. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये दिवंगत माजी आमदार लवू मामलेदार आणि एका रिक्षा चालकामध्ये वाद निर्माण झाल्याचे दिसत आहे. बेळगाव येथील स्थानिक रिक्षा चालकाच्या रिक्षेला गाडीचा धक्का लागल्याने या दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता, अशी माहिती उघड झाली आहे. मामलेदार आणि रिक्षाचालकात वादावादी झाली. यावेळी रिक्षा चालकाने मामलेदार यांच्या कपाळावर जोरदार प्रहार केला. ही रिक्षा मुजाहिद शकील जमादारची होती. रिक्षाचालकाने मामलेदार यांना अडवलं आणि वाद घालायला सुरुवात केली. हा वाद इतका विकोपाला गेला की रिक्षाचालकाने मामलेदार यांना लगावली. पोलिसांनी रिक्षा चालकावर खुनाचा गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, त्यांचा नेमका कशामुळे मृत्यू झाला हे उत्तरीय तपासणीत स्पष्ट होणार आहे.
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये रिक्षाचालक लवू यांच्यावर हात उचलताना देखील दिसतोय. दोघांमध्ये झालेल्या बाचाबाचीनंतर लावू मामलेदार पायऱ्या चढून आत देखील येताना दिसतायत. मात्र त्यानंतर त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने जागीच दुर्दैवी मरण आल्याचे स्पष्ट झाले आहे. ते गोव्यातील फोंडा मतदारसंघातून 2012 ते 17 या कालावधीमध्ये आमदार होते. बेळगावमध्ये खडेबाजारमधील शिवानंद लॉजजवळ ही घटना घडली. लॉजच्या मॅनेजरने या घटनेची माहिती मार्केट पोलिसांना दिली. मार्केट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. लवू मामलेदार यांना बेळगावच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी त्यांची वैद्यकीय तपासणी केली असता ते मृत असल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. याप्रकरणी पोलिसांनी रिक्षा चालकाला अटक केली आहे. या प्रकरणात पुढील चौकशी सुरु आहे.
दरम्यान, ऑटो रिक्षा चालकाने मारहाण केली त्यावेळी मामलेदार घटनास्थळीच कोसळले होते, त्यामुळे मारहाणीनंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला असावा आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मारहाणीच्या घटनेनंतर सुभाषनगर येथील ऑटोरिक्षा चालक मुजाहिद शकील सनदी फरार झाला होता. पोलिसांनी वेगाने तपास चक्र फिरून अटक केली असून त्याची चौकशी सुरु आहे. याप्रकरणी मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. गोव्याच्या माजी आमदारावर झालेल्या हल्ल्यानंतर पोलीस प्रशासन खडबडून जागं झालं आहे. अधिक तपास पोलीस करत आहे. मयत लवू ममलेदार हे 2012 ते 2017 या कालावधीत फोंडा मतदारसंघाचे आमदार होते. 2012 च्या गोवा विधानसभा निवडणुकीत त्यांनी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या तिकिटावर विजय मिळवला होता. त्यानंतर 2017 च्या गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या रवी नाईक यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. लवू मामलेदार तीन महिन्यांसाठी अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसचे सदस्य होते, तथापी डिसेंबर 2021 मध्ये त्यांनी पक्ष सोडला आणि जानेवारी 2022 मध्ये ते काँग्रेसमध्ये सामील झाले होते.
मूळ दुर्गाभाट फोंडा येथील; पण सध्या पर्वरी येथे राहणारे फोड्याचे माजी आमदार लवू मामलेदार यांच्या आकस्मिक निधनाचादल सर्वच क्षेत्रांतून दुःख व्यक्त करण्यात येत आहे. उद्या रविवारी फोड्यात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी तसेच दोन कन्या असा परिवार आहे. पोलिस अधिकारी ते आमदार असा प्रवास केलेल्या लवू मामलेदार यांना विधानसभा निवडणुकीत दुसऱ्यांदा विजय मिळू शकला नाही, गोवा पोलिस खात्यात सुरवातीला उपनिरीक्षक म्हणून सेवेत रुजू झालेले लवू मामलेदार यांनी निरीक्षक ते उपअधीक्षक पदापर्यंत मजल मारली होती, आपल्या पोलिस सेवेच्या कारकिर्दीत त्यांनी वाळपई पोलिस प्रशिक्षण केंद्र, फोडा, पणजी मुख्यालय आणि राखीव पोलिस दलात सेवा बजावली होती.
