एक भयानक घटना...! @कर्नाटक

एक भयानक घटना...!
@कर्नाटक

belgavkar.com | belgaum | belgavkar

महिलेने स्वतःच्या मुलाला फेकले मगरींच्या कालव्यात

कर्नाटक — दांडेली — उत्तर कन्नड : कर्नाटक मधील हालामदी गावामध्ये एक भयानक मन सुन्न करणारी घटना घडली आहे. 32 वर्षीय महिलेचे तिच्या पतीसोबत जोरदार भांडण झाल्याने तिने स्वतःच्याच मुलाला मगिरींनी भरलेल्या तलावात फेकले. यामध्ये त्या 6 वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे. मिळलेल्या माहितीनुसार, 6 वर्षाच्या या मुलाला बोलायची आणि ऐकण्याची समस्या होती म्हणजे तो मूक-बधिर होता. या कारणामुळे पती-पत्नीमध्ये वारंवार वाद व्हायचे.
शनिवारी रात्री या दोघांमध्ये परत वाद झालेत व या लहान मुलाला घेऊन ही महिला घराबाहेर निघून गेली. डोक्यात राग असल्याने तिने आपल्या पोटच्या गोळ्यालाच मगरींनी भरलेल्या कालव्यामध्ये फेकले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा कालवा मगरींनी भरलेल्या काळी नदीला जाऊन मिळतो. पोलीस आणि फायर ब्रिगेड यांच्या टीमने सर्च ऑपरेशन सुरु केले.
रात्रभर शोधल्यानंतर देखील चिमुरड्याचा मृतदेह सापडला नाही. दुसर्यादवशी रविवारी पुन्हा शोधण्यात आले तर सर्च टीमला मगरीच्या तोंडात या चिमुरड्याचा मृतदेह मिळला. मगरीने त्याचे शरीर अर्धे खाल्ले होते. तसेच आरोपी महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Karnataka Dandeli boy dies after mother throws him in crocodile infested waters

boy dies after mother throws him in crocodile infested waters

एक भयानक घटना...! @कर्नाटक
महिलेने स्वतःच्या मुलाला फेकले मगरींच्या कालव्यात

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm