माजी पंतप्रधान आणि माजी मुख्यमंत्र्यांचे नाव वापरण्यास बंदी @कर्नाटक

माजी पंतप्रधान आणि माजी मुख्यमंत्र्यांचे नाव वापरण्यास बंदी @कर्नाटक

belgavkar.com | belgaum | belgavkar

खासदार रेवण्णा यांचे अश्‍लील व्हिडिओ पेन ड्राईव्ह प्रकरण

Prajwal Revanna case : Bengaluru court gags media from false reporting on HD Deve Gowda

कर्नाटक-बंगळूर : लैंगिक छळ आणि अश्‍लील व्हिडिओ पेनड्राईव्ह प्रकरणात (Obscene Video Pendrive Case) माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा (H. D. Deve Gowda) आणि माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी (H. D. Kumaraswamy) यांच्या नावाचा वापर करण्यावर सत्र न्यायालयाने प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. देवेगौडा आणि कुमारस्वामी यांनी खटल्यांचे वृत्त प्रसारित करताना त्यांच्या नावांचा विनाकारण वापर होऊ नये, यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करत सत्र न्यायालयाने प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.
खासदार प्रज्वल रेवण्णा यांचे अश्‍लील व्हिडिओ पेन ड्राईव्ह प्रकरण आणि माजी मंत्री रेवण्णा यांचे महिला छळ आणि अपहरण प्रकरण देशभर जोरदार चर्चेत आले आहे. काँग्रेस वारंवार देवेगौडा आणि कुमारस्वामी यांच्या नावाचा उल्लेख करत आरोप करत आहे. अनावश्यक आरोपांच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांनी न्यायालयात धाव घेतली. खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्या अश्‍लील व्हिडिओ पेन ड्राईव्ह प्रकरणात देवेगौडा यांचे नाव विनाकारण वापरू नये, असे वक्कलिग जागृती मंचचे अध्यक्ष के. सी. गंगाधर यांनी म्हटले आहे. देवेगौडा यांचे मन दुखावते, असे याबाबतचे निवेदन पत्रकारांना दिल्याचे गंगाधर यांनी सांगितले. त्यामुळे त्यांचे नाव कोणीही वापरू नये, अशी विनंती त्यांनी केली.

Prajwal Revanna case : Bengaluru court gags media from false reporting on HD Deve Gowda

Media restricted from linking Deve Gowda and HDK to explicit videos

माजी पंतप्रधान आणि माजी मुख्यमंत्र्यांचे नाव वापरण्यास बंदी @कर्नाटक
खासदार रेवण्णा यांचे अश्‍लील व्हिडिओ पेन ड्राईव्ह प्रकरण

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm