धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांवर बनवण्यात आलेला ‘छावा’ सिनेमा सध्या थिएटरमध्ये हाऊसफुल्ल सुरु आहे. सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून खूप चांगल्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. हा सिनेमा पाहून प्रेक्षकांना अश्रू अनावर झाले. छत्रपती संभाजी महाराजांचा संघर्ष पाहून लोक भारावून गेले. ‘छावा’ हा सिनेमा ऐतिहासिक आणि राष्ट्रभक्तीने भारलेला असून त्यातील प्रत्येक सीन प्रेक्षकांच्या काळजाला भिडणारा आहे. विशेषतः ‘ ॐ नमः पार्वती पतये, हर-हर महादेव! ’ मात्र हा सीन ‘छावा’च्या स्क्रिप्टमध्ये लिहिलेला नव्हताच हे तुम्हाला माहितीय का? हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल मात्र हे खरं आहे. हा सीन मग कसा शूट झाला? आणि हा सीन कसा घेण्यात आला याविषयी जाणून घेऊया.
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code
‘ॐ नमः पार्वती पतये, हर-हर महादेव!’ सीन नेमका कसा शूट झाला याविषयी विकी कौशलने सांगितलं. त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यामध्ये त्याने या सीनविषयी खुलासा केला. चित्रपटाच्या स्क्रिप्टमध्ये या सीनचा समावेश नव्हता. मात्र, शूटिंगदरम्यान कलाकारांच्या भूमिकेमधील इन्टेन्सिटी आणि त्या प्रसंगाची गरज लक्षात घेऊन दिग्दर्शकांनी हा सीन एक्सटेम्पोर (तत्काळ) शूट करण्याचा निर्णय घेतला. खरंतर स्क्रिप्टमध्ये नसतानाही विकी कौशलने हे वाक्य घेतलं. त्याचा हा सीन आणि डायलॉग पाहून दिग्दर्शकही थक्क झाले.
तो फक्त एक संवाद नसून, तो त्या क्षणी असलेल्या भावना, उर्जा आणि जिद्दीचं प्रतीक असल्याचं विकी कौशल म्हणाला. सर्व मावळ्यांना युद्धासाठी जाण्याअगोदर हे स्पीच होतं ज्यामुळे ते ऑलरेडी युद्धात गेलेले असतात. मला दिग्दर्शकांनी सांगितलं होतं की स्पीचमध्ये एवढी एनर्जी पाहिजे की स्पीच संपल्यावर लोक विचाराने ऑलरेडी युद्धाच्या ठिकाणी पोहोचलेले असतात. तेव्हाच एक मेन्टल नोट होतं की, शेवटी मी ही लाईन घेणारच. मग मी ‘ॐ नमः पार्वती पतये, हर-हर महादेव!’ ही लाईन घेतली. याविषयी कोणालाच माहित नव्हतं तरीही सर्वांनी याला कोरस दिला. त्यामुळे ती जी रिअँक्शन आली ती सगळ्यांची नॅचरल रिअँक्शन होती. त्यावेळी त्यांना जे फील होत होतं त्यांनी तसंच रिअँक्ट केलं, असं विकी कौशलने सांगितलं. लक्ष्मण उतेकर यांनी सांगितलं की, हा सीन स्क्रिप्टमध्ये नव्हताच तरीही विकी त्याच्या मनाने ‘ॐ नमः पार्वती पतये, हर-हर महादेव!’ ही लाईन घेतली आणि या लाईनने मॅजिक क्रिएट केला. सीन झाल्यावर मी त्याला जाऊन पहिली मिठी मारली. आणि अशा प्रकारे हा सीन स्क्रिप्टमध्ये नसतानाही शूट झाला.
दरम्यान, ‘हर-हर महादेव’ हा केवळ एक मंत्र नाही, तर तो पराक्रम, निष्ठा आणि लढाऊ वृत्तीचं प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठ्यांच्या लढायांमध्ये हा जयघोष केला जात असे, जो योद्ध्यांना प्रचंड प्रेरणा देत असे. त्यामुळे ‘छावा’ चित्रपटात या घोषणेला खूप चांगला प्रतिसाद मिळत असून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारा हा सीन आहे.कलेक्शनमध्येही सिनेमाने डरकाळी फोडलीदोन दिवसात सिनेमाने जोरदार कलेक्शन केलं. विकी कौशलच्या चित्रपटाने पहिल्या दिवशी अपेक्षेपेक्षा जास्त कमाई केली आहे. सॅकनिल्कच्या अहवालानुसार, ‘छावा’ने पहिल्या दिवशी 31 कोटी रुपये कमावले, तर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी त्याचे कलेक्शन 36.5 कोटी रुपये होते.
