बेळगाव—belgavkar—belgaum : चालत्या कारला अचानक आग लागल्याची घटना सोमवारी सायंकाळी साडेआठच्या सुमारास बॉक्साईट रोडवरील आंबेवाडी क्रॉसवर (हिंडलगा) घडली. बॉक्साईट रोडवरुन बेळगावच्या दिशेने ब्रीझा कार जात होती.
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code
आंबेवाडी क्रॉसवर येताच बॉनेटमधून धूर येऊ लागला. त्यामुळे, चालकाने कार थांबविली. कारमधील सर्वजण उतरुन बाजूला होताच मोठा भडका उडाला. स्थानिकांच्या मदतीने आग विझविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. जवळच असलेल्या गॅरेजमधील पाईपद्वारे आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र, आगीत कारचे मोठे नुकसान झाले. सदर कार कुद्रेमानीतील एका युवकाची असल्याचे सांगण्यात येत आहे.
