Kalinga Institute of Industrial Technology (KIIT) campus in Odisha : 16 फेब्रुवारी रोजी केआयआयटी विद्यापीठामध्ये बी-टेक शिकणाऱ्या 20 वर्षीय प्रकृती लमसाल या नेपाळी विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर तणाव निर्माण झाला होता (third-year student from Nepal was found dead in her hostel room. BTech student Prakriti Lamsal). त्यानंतर विद्यापीठाने नेपाळी विद्यार्थ्यांना माघारी जाण्यास सांगितलं होतं. सोमवारी पुन्हा विद्यापीठाने विद्यार्थ्यांना परत येण्याचं आवाहन केलं आहे. केआयआयटीचे प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांमध्ये मोठा वाद झाला होता.
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code
त्यानंतर परिस्थिती बिघडली आणि विद्यार्थ्यांना परत जाण्यास सांगण्यात आलं. याचा व्हिडीओदेखील व्हायरल झाला आहे. यामध्ये KIIT चे अधिकारी विद्यार्थ्यांना धमकावत असल्याचं दिसतंय. त्यात म्हणतात, 40 हजार विद्यार्थ्यांना आम्ही रोज जेवण देतो. हे नेपाळच्या जीडीपीपेक्षा जास्त आहे. या व्हिडीओनंतर विद्यार्थी आक्रमक झाले होते.
केआयआयटीमधल्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, विद्यापीठामधील परिस्थिती लक्षात घेता नेपाळमधील विद्यार्थांना घरी पाठवण्यात आले आहे. त्यानंतर विद्यापीठाने एक्स अकाऊंटवरुन एक पोस्ट करत विद्यार्थ्यांना परत येण्याचं आवाहन केलं. विद्यार्थीनीच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी एका भारतीय विद्यार्थ्याला अटक केली असून आता परिस्थिती पूर्वपदावर आलेली आहे. वर्ग सुरु करण्यात येत आहेत. असं विद्यापीठाने म्हटलं आहे.Please click here to Watch this Video or Photo on X (twitter)
सोशल मीडियावर अनेक पोस्ट समोर आल्या आहेत ज्यात दावा केला जात आहे की विद्यार्थिनीचा तिच्या माजी प्रियकराकडून छळ केला जात आहे. तिच्या चुलत भावानेही तक्रार दाखल केली आहे की विद्यापीठातील एका विद्यार्थ्याने तिला ब्लॅकमेल केले आहे, ज्यामुळे तिने आत्महत्या केली. रात्री 500 विद्यार्थ्यांच्या निदर्शनांमुळे कॅम्पसमध्ये तणाव निर्माण झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अधिकाऱ्यांनी दोन पलटणी पोलिस तैनात केले. परिस्थिती लक्षात घेता, विद्यापीठाने सांगितले की त्यांनी नेपाळमधील विद्यार्थ्यांना घरी परत जाण्यास सांगितले, त्यानंतर नेपाळी विद्यार्थ्यांना दोन बसमध्ये भरून कटक रेल्वे स्थानकावर सोडण्यात आले.
