बेळगाव : कडोलीत साकारण्यात येणार आधुनिक क्रीडांगण; राष्ट्रीय दर्जाचे सुसज्ज मैदान

बेळगाव : कडोलीत साकारण्यात येणार आधुनिक क्रीडांगण;
राष्ट्रीय दर्जाचे सुसज्ज मैदान

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : देशपातळीपर्यंत छेप घेतलेल्या कडोली गावचे नाव क्रीडा क्षेत्रात आदराने घेतले जाते. गावातील खेळाडूंच्या सोयीसाठी अत्याधुनिक सोयींनीयुक्त क्रीडांगण उभारण्यात येणार आहे. कडोलीतील शिवाजी माध्यमिक हायस्कूलसमोरील खुल्या मैदानाची बेळगाव जिल्हा युवजन क्रीडा खात्याच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. या ठिकाणी राष्ट्रीय दर्जाचे सुसज्ज मैदान तयार करण्यासाठी आराखडा बनविण्याचे नियोजन केले आहे, अशी माहिती जिल्हा पंचायतीचे उपाध्यक्ष अरुण कटांबळे यांनी दिली. यासाठीच्या आराखड्यात 400 मीटर धावण्याचे ट्रॅक, फुटबॉल मैदान, क्रिकेट मैदान, कबड्डी, खो - खो, हॉलीबॉल व इतर अनेक खेळांची मैदाने करण्यात येणार आहे.
गावातील आमराई मैदानात आधुनिक क्रीडांगण मैदानाभोवती क्रीडा शौकिनांना बसण्यासाठी गॅलरी व सार्वजनिक ध्वजवंदनासाठी मोठे व्यासपीठ बनविण्याचाही प्रयत्न आहे. या राष्ट्रीय दर्जाच्या मैदानामुळे कडोली जवळील दहा ते पंधरा गावातील युवा क्रीडापटूंना सरावासाठी मैदान उपलब्ध होईल, अशी माहिती यावेळी दिली.
आमदार सतीश जारकीहोळी यांच्या सूचनेनुसार येथे सुसज्ज मैदान तयार करण्यात येणार आहे. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी मठद, जिल्हा पंचायत उपाध्यक्ष श्री. कटांबळे, सायकल प्रशिक्षक एम. पी. मरनूर, राजू मायाण्णा, शिवाजी हायस्कूल शाळेचे क्रीडा शिक्षक नारायण पाटील यांनी या जागेची पाहणी केली.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : कडोलीत साकारण्यात येणार आधुनिक क्रीडांगण; राष्ट्रीय दर्जाचे सुसज्ज मैदान

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm