गोवा : छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गोव्याच्या भूमीतील ‘वास्को द गामा’ चे नामांतर ‘संभाजी’ असे करावे, अशी सूचना महसूल खात्याने 1970 मध्ये केलेली आहे; मात्र अजूनपर्यंत हे नामांतर झालेले नाही. वास्कोचे नामांतर छत्रपती संभाजीनगर करावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून लोक करत आहेत; मात्र अजूनपर्यंत हे नामांतर झालेले नाही.
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ चित्रपटाने इतिहासप्रेमींमध्ये आस्था निर्माण केली असतानाच छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्ताने छ. संभाजी महाराज यांच्या गोव्यासाठीच्या योगदानाबद्दल Vasco da Gama चे नामांतर छ. संभाजीनगर करण्याची मागणी पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे.
वास्को शहराचे नामांतर करण्याची ही मागणी खूप जुनी असून त्याचे संभाजीनगर कधी होणार, असा प्रश्न आता गोमंतकीय करत आहेत. वास्कोचे संभाजीनगर नामांतर तातडीने करणे गरजेचे आहे. उत्तर प्रदेश सरकारने तातडीने निर्णय घेत अनेक ऐतिहासिक शहरांचे नामांतर केलेले आहे. यापूर्वी गोवा सरकारच्या गॅझेटमध्ये हे नामांतर जाहीर करण्यात आले होते आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी वास्को नगरपालिकेकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता. वास्कोच्या तत्कालीन मामलेदारांनी रेशन कार्डवर संभाजीनगरचा उल्लेख केला होता. यातील काही रेशनकार्ड आजही उपलब्ध आहेत.
सध्या ट्रिपल इंजिन सरकार आहे. वास्को नगरपालिका, राज्यातील सरकार आणि केंद्रातील सरकार एकाच पक्षाचे आहेत. स्थानिक आमदारही भाजपचे आहेत, तरीही ते याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष का करत आहेत, असा सवाल लोक उपस्थित करत आहेत. या मागणीसाठी आता लोकलढा उभारण्याची तयारी सुरु आहे.
याबाबत प्रा. सुभाष वेलिंगकर म्हणाले, वास्को-द-गामा कधीही गोव्यात आला नाही. 1498 मध्ये तो केरळच्या कालिकत बंदरात आला होता. त्याचदरम्यान अफान्सो अलबुकर्क हा पोर्तुगीज गोव्यात आला आणि त्याने विजापूरच्या आदिलशाहकडून गोवा जिंकला. त्यांनी आपल्या मित्राच्या प्रेमाखातीर शहराला वास्को हे नाव दिले.
